LSG Owner Sanjeev Goenka KL Rahul: आयपीएल २०२५ पूर्वी लखनऊन सुपर जायंट्स (LSG) ने एक मोठी घोषणा केली. लखनऊने भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानला संघाचा मेन्टॉर म्हणून नियुक्त केले आहे. एलएसजीचे मालक संजीव गोयंका यांनी आज कोलकाता येथे पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली. यादरम्यान, त्याने केएल राहुलच्या फ्रँचायझीमधील भविष्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

आयपीएलच्या गेल्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सच्या दारूण पराभवानंतर केएल राहुल आणि गोयंका यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये संघ मालक कर्णधार केएल राहुलवर राग काढताना, त्याला जाब विचारताना दिसले होते. यानंतर, LSG संघाच्या कर्णधारपदात मोठा बदल करू शकते आणि IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी केएल राहुलला रिलीज करू सोडू शकते, अशी चर्चा सुरू झाली. मात्र आता संजीव गोएंका यांच्या वक्तव्यानंतर सारे चित्रच बदलले आहे. एलएसजीने राहुलला कायम ठेवल्यास राहुल संघाचा कर्णधार राहणार की नाही हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
bjp sujay patki
पहिली बाजू : आता महाराष्ट्र थांबणार नाही!
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Loksatta lalkilla Amit Shah statement of Congress defeat
लालकिल्ला: अमित शहांचे काँग्रेस पराभवाचे सत्यकथन!

हेही वाचा – Shakib Al Hasan: “शकीबवरील आरोप जोपर्यंत…” शकीब अल हसनवरील हत्येच्या आरोपानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा धक्कादायक निर्णय

आयपीएल २०२४ नंतर, एलएसजी केएल राहुलला संघात कायम ठेवणार नसल्याचा अंदाज लावला जात आहे. पण आता संघ मालकांनी एक मोठे वक्तव्य करत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. संजीव गोयंका म्हणाले की, “मी कोणत्याही अफवांवर भाष्य करू इच्छित नाही. केएल राहुल हा लखनऊ सुपर जायंट्स म्हणजेच एलएसजी कुटुंबाचा महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग आहे.” विशेष म्हणजे भारतीय यष्टीरक्षक फलंदाज गोयंकाची कोलकाता येथे भेट घेतल्यानंतर एका दिवसानंतर हे वक्तव्य आले आहे. सोमवारी केएल राहुलने संजीव गोयंका यांची भेट घेतली होती.

हेही वाचा – Jay Shah Net Worth: गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव, विविध व्यवसायातून दमदार कमाई, ३५व्या वर्षी आयसीसीचे बॉस; किती आहे जय शाहांची संपत्ती?

आयपीएल २०२२ पासून केएल LSG चा कर्णधार

आयपीएल २०२२ पूर्वी एलएसजीने राहुलला १७ कोटींमध्ये करारबद्ध केले होते. या मोसमात लखनऊ संघाने गुजरात टायटन्स संघासह टूर्नामेंटमध्ये पदार्पण केले होते. कर्णधार या नात्याने, केएल राहुलच्या नेतृत्त्वाखाली संघ सलग दोनदा IPL प्लेऑफमध्ये जाण्यात यशस्वी ठरला पण तो अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. एलएसजीमध्ये सामील होण्यापूर्वी राहुल किंग्स इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज), रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद या तीन आयपीएल फ्रँचायझींकडून खेळला. केएलने २०१३ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.

राहुलने आतापर्यंत १३२ सामने खेळले आहेत. या कालावधीत ४६८३ धावा केल्या आहेत. राहुलने या लीगमध्ये ४ शतके आणि ३७ अर्धशतके केली आहेत. राहुलने IPL 2024 च्या १४ सामन्यात ५२० धावा केल्या होत्या. या काळात त्याने ४ अर्धशतके झळकावली.

Story img Loader