Sanjiv Goenka on Rohit Sharma about IPL 2025 Mega Auction: आयपीएल २०२४ च्या हंगामापूर्वी रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि हार्दिक पंड्याला संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले. फ्रँचायझीच्या या निर्णयावर चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. यानंतर सोशल मीडियावर अशी अटकळ बांधली जात होती की रोहित यावेळी मुंबई इंडियन्स सोडू शकतो. यानंतर, काही अशा चर्चा आहेत, की लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल २०२५ मेगा ऑक्शनमध्ये रोहित शर्माला खरेदी करण्यासाठी ५० कोटी रुपयांपर्यंतचे बजेट ठेवले आहे. यासंदर्भात आता एलएसजीचे मालक संजीव गोएंका यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे.

लखनौ फ्रँचायझी रोहितसाठी ५० कोटी रुपये खर्च करणार का?

रोहित शर्मासारख्या खेळाडूचा फायदा कोणत्याही संघाला होईल, असे मत संजीव गोयंका यांनी व्यक्त केले, परंतु त्याच्यावर एवढी मोठी रक्कम खर्च करणे योग्य ठरणा नाही. स्पोर्ट्स तकला दिलेल्या मुलाखतीदरम्यान संजीव गोएंका म्हणाले, “कोणालाही माहिती नाही की रोहित शर्मा लिलावात सहभागी होत आहे की नाही? मुंबई इंडियन्स रोहितला सोडणार का यावर अवलंबून आहे. तरीही, जर रोहित लिलावात सहभागी झाला आणि जर तुम्ही त्याच्यावर पर्समधील ५० टक्के खर्च केला, तर तुम्ही इतर खेळाडूंना कसे खरेदी करू शकाल.

Special trains for Konkan and Goa on year end and long weekend
कोकण, गोव्यासाठी विशेष रेल्वेगाड्या
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
demand for ransom of Rs 2 crore case filed against three including Valmik Karad in kej
दोन कोटींच्या खंडणीची मागणी; वाल्मीक कराडांसह तिघांवर केजमध्ये गुन्हा
amazon smbhav 2024 nitin gadkari
देशातील वाहतूक खर्च निम्म्यावर आणणार – नितीन गडकरी
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
loksatta readers feedback
लोकमानस: …त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी!
Gondia VVPAT, Gondia EVM, Gondia latest news,
गोंदिया : व्हीव्हीपॅट, ईव्हीएमवर शंका! आणखी एक काँग्रेस उमेदवाराचा पुनर्मोजणीसाठी अर्ज…

प्रत्येकाचा आवडता खेळाडू असतो – संजीव गोएंका

तसेच संजीव गोएंका यांना त्यांच्या ‘विशलिस्ट’बद्दल विचारले असता ते म्हणाले की, “प्रत्येकाचा आवडता खेळाडू असतो. प्रत्येक फ्रँचायझीला सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्तम कर्णधार हवा असतो. अशा परिस्थितीत आपल्याकडे काय आहे आणि आपण त्याचे काय करू शकतो. हे बघावे लागेल. मला खूप काही हवंय पण तुम्हाला सगळं मिळू शकत नाही.”

हेही वाचा – Naveen Ul Haq Virat Kohli : विराट कोहलीच्या रिल्सने नवीन उल हक वैतागला, VIDEO होतोय व्हायरल

दरम्यान, एलएसजीने बुधवारी झहीर खानची फ्रेंचायझीचा मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली. हे पद यापूर्वी २०२२ आणि २०२३ हंगामात गौतम गंभीरकडे होते. त्यानंतर २०२४ मध्ये गंभीर कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामील झाल्यानंतर ते रिक्त झाले. झहीर मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील होईल. सहाय्यक प्रशिक्षक लान्स क्लुसनर आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्स त्यांच्या भूमिकेत राहतील, याची पुष्टीही गोयंका यांनी केली.

Story img Loader