भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज क्राइस्टचर्चमध्ये तिसरा आणि मालिकेतील शेवटचा सामना खेळवला जात आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे क्रिकेटच्या मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगतदार सामना होत आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर बीसीसीआयला ट्रोल केलं जात आहे. कारण, होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही भारताचा यष्टीरक्षक संजू सॅमसनला प्लेईंग-११ मध्ये खेळवण्यात आलं नाही. त्यामुळे सोशल मीडियावर बीसीसीआय विरोधात नाराजीचा सूर आवळला जात आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचं नेतृत्व करणाऱ्या संजू सॅमसनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये अनेकदा डावलण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर संजूच्या चाहत्यांनी बीसीसीआयला ट्रोल करून धारेवर धरले आहे. अशातच संजूचे बालपणीचे प्रशिक्षक बीजू यांनी माध्यमांशी बोलताना बीसीसीआयवर होत असलेल्या टीका-टीप्पणीवर प्रतिक्रिया दिली आहे.

संजू सॅमसनचे प्रशिक्षक माध्यमांशी बोलताना म्हणाले….

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत सलग दुसऱ्या सामन्यात संजू सॅमसनची प्लेईंग-११ मध्ये निवड केली नाहीय. त्यामुळे संजूच्या चाहत्यांसह इतर क्रिकेट प्रेमींनी बीसीसीआय संजूला डावलत असल्याचे आरोप केले आहेत. यावर संजूचे प्रशिक्षक बीजू यांनी माध्यमांशी बोलताना सूचक वक्तव्य केलं आहे. बीजू म्हणाले, “संजू सॅमसनच्या निवडीबाबत बीसीसीआयला केलेल्या ट्रोलिंगबाबत मी सहमत नाहीय. २८ वर्षीय संजूची ऋषभ पंतसोबत स्पर्धा सुरु आहे, असं म्हणणं मला योग्य वाटत नाही. कारण त्याने रेड बॉल आणि व्हाईट बॉल क्रिकेट मध्ये यापूर्वीच चमकदार कामगिरी केली आहे. संजूकडे अजूनही पूरेसा वेळ आहे. तो भारतासाठी यापुढेही अप्रतिम कामगिरी करु शकतो.”

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

नक्की वाचा – अरुणाचलचा दुधसागर तुम्हाला खुणावतोय, CM पेमा खांडू यांनी शेअर केला धबधब्याचा जबरदस्त Video, तुम्ही पाहतच राहाल

“संजूला फक्त धीर धरण्याची गरज आहे. कारण सूर्यकुमार यादवलाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण करण्यासाठी दिर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. सूर्यकुमारला अखेर इंग्लंड विरुद्धच्या टी२० सामन्यात मार्च २०२१ मध्ये खेळण्याची संधी मिळाली. तेव्हापासून मुंबई इंडियन्सचा स्टार प्लेयर सूर्यकुमारने चमकदार कामगिरी केली आणि आयसीसी क्रमवारीत सर्वात जास्त धावा करण्याच्या शर्यतीत अव्वल स्थान गाठलं. त्यामुळे सूर्यकुमार यादव एक प्रेरणादायी खेळाडू आहे. सूर्यकुमारने उशीरा पदार्पण करुन आतंराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जलवा दाखवला. त्यामुळे संजू सूर्यकुमारचं उदाहरण समोर ठेऊ शकतो.”

नक्की वाचा – बजाओ! भर लग्नमंडपात नवऱ्यासमोरच नवरीचा भन्नाट डान्स, Viral Video पाहून नेटिझन्स म्हणाले, “लग्नात अशीच नवरी…”

“बीजू संजू सॅमसनवर स्तुतीसुमने उधळत म्हणाले, U-19 पासून संजूला खेळताना तुम्ही पाहिलं असेल, तर तो अगदी सहजपणे बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू मारणारा खेळाडू आहे. तसंच संजू क्रिकेटच्या मैदानात सर्व दिशेला आक्रमक फलंदाजी करतो. त्याची खेळण्याची पद्धत कदाचित सूर्यकुमारप्रमाणे नसेल, पण तो त्याच्या स्टाईलने 360 डिग्री फलंदाजी करु शकतो. आयपीएलमध्ये मुंबई आणि राजस्थानच्या सामन्यात संजूने मिचेल जॉनसनला मोठे षटकार ठोकले होते.”

Story img Loader