टी २० विश्वचषक संघातील अंतिम १५ संजू सॅमसनला संघात स्थान न मिळाल्याने अनेक चाहते आणि काही माजी खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केले होते, यावर सोशल माध्यमांमध्ये खूप चर्चा देखील झाली. पण त्याची भरपाई म्हणून बीसीसीआयने त्याच्यावर आगामी न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा कर्णधार म्हणून त्याची निवड केली आहे. तीन सामन्यांची ही मालिका २२ सप्टेंबरपासून खेळली जाणार असून शेवटचा सामना हा २७ तारखेला होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२७ वर्षीय सॅमसनला टी २० विश्वचषक २०२२ साठी संघात जागा देण्यात आली नाही. तसेच टी २० विश्वचषकापूर्वी मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी २० मालिकेसाठीही त्याला दुर्लक्षित करण्यात आले आहे. त्यामुळेच भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिरूअनंतपूरम येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेत सॅमसनचे चाहते त्याच्या नावाचा टी शर्ट घालून स्टेडियमवर बीसीसीआयचा निषेध नोंदवण्याच्या तयारीत होते. पण, त्यांचा हा विरोध काही अंशी मावळेल अशी बातमी समोर येतेच… विरोध प्रदर्शन मागे घेण्याचे ठरवले.

भारतीय संघाकडून २०१५ मध्ये टी २०त पदार्पण करणाऱ्या संजू सॅमसनला ७ वर्षांत केवळ १६ सामने खेळण्याची संधी मिळाली. ७ एकदिवसीय सामन्यात त्याने ४४ च्या सरासरीने फक्त १७६ धावा केल्या आहेत. २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंड अ विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत संजू सॅमसन भारत अ संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड हेही संघात आहेत. इशान किशनला वगळून केएस भरत याची यष्टिरक्षक म्हणून निवड केली गेली आहे.

हेही वाचा-  आशिया चषकात विराटची जोरदार कामगिरी, टी २० क्रमवारीत १४ व्या स्थानी झेप

भारत अ संघ

पृथ्वी शॉ, अभिमन्यू ईश्वरन, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, संजू सॅमसन (कर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, शाहबाज अहमद, राहुल चाहर, तिलक वर्मा, कुलदीप सेन, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, नवदीप सैनी, राज अंगद बावा