Sanju Samson Father Viswanath video viral : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-२० मालिकेत शानदार पुनरागमन केले आहे. संजूने धमाका केला आणि पहिल्याच सामन्यात शतक झळकावले. अशाप्रकारे संजूने टी-२० क्रिकेटमध्ये सलग दोन शतकं झळकावून मोठी कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो जगातील चौथा आणि भारताचा पहिला फलंदाज ठरला. आता संजू सॅमसनच्या वडिलांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते धोनी-विराटसह रोहितवर टीका करताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजू सॅमसनचे वडील काय म्हणाले?

याआधी, संजू सॅमसनने गेल्या महिन्यात बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शानदार शतक झळकावले होते. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावले. गेल्या ४ सामन्यात दोन शतकं झळकावल्यानंतर संजू सॅमसनची सर्वत्र चर्चा होत आहे. तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होत आहे. दरम्यान, संजू सॅमसनचे वडील सॅमसन विश्वनाथ यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये संजूच्या वडिलांनी भारतीय क्रिकेट संघाच्या दिग्गजांवर जोरदार हल्ला चढवला आहे.

संजू सॅमसनच्या वडिलांचे गंभीर आरोप –

एका मल्याळम वाहिनीशी बोलताना संजू सॅमसनचे वडील विश्वनाथ म्हणाले, ‘माझ्या मुलाच्या करिअरची १० वर्षे ३-४ लोकांनी बरबाद केली. धोनी-कोहली, रोहित आणि राहुल द्रविड यांच्यासारख्या प्रशिक्षकांमुळे त्याच्या कारकिर्दीची १० वर्षे वाया गेली. त्यांनी जितक्यांदा डावलले तितक्याच वेगाने तो परत आला आहे.’ हा व्हिडीओ कधीचा आहे, हे स्पष्ट झाले नसले तरी दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात होताच संजूच्या वडिलांचे वक्तव्य व्हायरल होत आहे.

हेही वाचा – MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीने पत्नी साक्षीसह रांचीमध्ये केले मतदान, चाहत्यांच्या गर्दीने घेरल्याचा VIDEO व्हायरल

संजूने आतापर्यंत भारतासाठी ३६ सामन्यांच्या ३२ डावांमध्ये १५१.०७ च्या स्ट्राईक रेटने ७०१ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने २ शतके आणि २ अर्धशतके झळकावली आहेत. विशेष म्हणजे त्याने सलग दोन सामन्यात शतक झळकावल्यानंतर तो पुढील दोन सामन्यात शून्यावर बाद झाला आहे. ज्यामुळे आता पुन्हा त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanju samson father says ms dhoni virat kohl rohit sharma and rahul dravid these four people destroyed 10 years of my son vbm