Sanju Samson reach 39th position in ICC T20I rankings : टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन सध्या चर्चेत आहे. त्याने काही दिवसांपूर्वी सलग दोन टी-२० सामन्यात सलग शतकं झळकावल्यापासून चर्चेत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात संजू खातेही न उघडता बाद झाला असला, तरी त्याने आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीलाही मोठा फायदा झाला. आयसीसीने बुधवारी टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटची लेटेस्ट क्रमवारी जाहीर केली आहे, ज्यामध्ये संजू सॅमसनला मोठा फायदा झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजू सॅमसनने २७ स्थानांची घेतली मोठी झेप –

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० मालिका सुरू होण्यापूर्वी, संजू सॅमसन आयसीसी टी-२० क्रमवारीत ६६ व्या स्थानावर होता. मात्र अवघ्या दोन सामन्यांनंतर त्याने थेट २७ स्थानांची झेप घेतली असून आता तो ३९व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग आणि रँकिंग अधिक चांगले होऊ शकले असते, पण गेल्या सामन्यात त्याला शून्यावर बाद झाल्याचा फटकाही बसला. जेव्हा त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात १०७ धावांची खेळी खेळली होती. यानंतर त्याचे रेटिंग थेट ५५० पर्यंत पोहोचले होते.

संजूला त्याचे रेटिंग आणि रँकिंग सुधारण्याची संधी –

यानंतर संजू दुसऱ्या टी-२० सामन्यात शून्यावर बाद झाला, त्यामुळे त्याला नुकसान सहन करावे लागले. आयसीसीने जाहीर केलेल्या नवीन क्रमवारीत त्याचे रेटिंग ५३७ आहे आणि सध्या तो ३९व्या स्थानावर आहे. चांगली गोष्ट म्हणजे या दक्षिण आफ्रिका मालिकेत संजूचे आणखी दोन सामने बाकी आहेत. यामध्ये देखील, जर त्याने चांगली कामगिरी केली, तर तो पुन्हा आपले सर्वकालीन उच्च रँकिंग मिळवू शकतो आणि कदाचित टॉप-२० मध्ये देखील पोहोचू शकतो.

हेही वाचा – Mohammad Rizwan : ‘मी फक्त टॉस आणि प्रेझेंटेशनसाठी कर्णधार…’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर मोहम्मद रिझवानचे मोठे वक्तव्य

रवी बिश्नोईलाही झाला फायदा –

मात्र, यासाठी त्याला आणखी एक चांगली खेळी खेळावी लागणार आहे. असं असलं तरी, अलीकडच्या काळात संजूने त्याला मिळालेल्या संधींचा पुरेपूर फायदा घेतला आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतर कोणताही भारतीय फलंदाज करू शकला नाही. तसेच टीम इंडियाचा युवा गोलंदाज रवी बिश्नोईलाही टी-२० क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला आहे. बिष्णोई आता सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. यासोबतच चार स्थानांनी झेप घेत श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू वानिंदू हसरंगाने अव्वल स्थानावर आपला दावा मजबूत केला आहे.

हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी अन्य देशात हलवल्यास पाकिस्तान बोर्डाला कोट्यवधींचा फटका; कसा ते जाणून घ्या

पाकिस्तान संघाने नुकतीच ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक वनडे मालिका जिंकली. शाहीन आफ्रिदीने या मालिकेत शानदा गोलंदाजी केली. या तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने ८ विकेट्स घेतल्या, ज्यामुळे शाहीनने एक वर्षानंतर एकदिवसीय आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराजचा मागे टाकत तीन स्थानांनी झेप घेत अव्वल स्थान गाठले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanju samson has gained 27 places to reach 39th position in the latest icc t20i rankings shaheen afridi and ravi bishnoi benefit vbm