Sanju Samson Meets Female Fan Injured By His Massive Video: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. या सामन्यात भारताने १ विकेट गमावत २८३ धावा केल्या, यामध्ये संजू सॅमसन आणि तिलक वर्माच्या शतकाचा मोठा वाटा होता. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने दोन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर ५६ चेंडूत १०९ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात चौकार-षटकारांचा पाऊस पडला. पण या सामन्यात भारताच्या फलंदाजीदरम्यान एक वाईट घटना घडली. संजू सॅमसनच्या एका षटकारामुळे मैदानातील चाहती घायाळ झाली होती. तिचा व्हीडिओही व्हायरल झाला होता.
भारताच्या डावातील १० व्या षटकात ही घडना घडली. १०व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर संजू सॅमसनने ट्रिस्टन स्टब्सच्या गोलंदाजीवर मिडविकेटच्या दिशेने जबरदस्त षटकार लगावला. संजूच्या बाहूतली ताकद या षटकारात उमटली. चेंडू प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका महिला चाहतीच्या चेहऱ्यावर जाऊन आदळला. हे लक्षात आल्यानंतर संजूने तात्काळ चाहतीच्या दिशेने सॉरीचा इशारा केला. हा चेंडू लागल्यानंतर चाहतीचा रडतानाचा व्हीडिओही व्हायरल झाला होता.
संजूने मारलेला षटकार प्रेक्षकांमध्ये असलेल्या एका वस्तूवर आदळला आणि तिथून उसळी घेऊन चाहतीच्या चेहऱ्यावर जाऊन बसला. अचानक झालेल्या या अपघातामुळे चाहती रडू लागली. तिचा हा रडतानाचा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. पण आता सामन्यानंतर संजू सॅमसन स्वत: जाऊन त्या चाहतीला भेटल्याचा व्हीडिओ समोर झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यानंतर संजूने सॅमसनने त्या महिला चाहतीची भेट घेतली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये संजूला अनेक चाहत्यांनी घेरले आहे. यामध्ये तो एका महिला चाहतीसोबत उभा राहून बोलत आहे. संजू सॅमसनच्या या कृतीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
चौथ्या टी-२० सामन्यातील षटकारासह संजूने गेल्या पाच डावातलं दुसरं शतक झळकावलं. संजूने ५६ चेंडूत ६ चौकार आणि ९ षटकारांसह नाबाद १०९ धावांची तडाखेबंद खेळी केली. संजूला तोडीस तोड खेळ करत तिलक वर्माने सलग दुसऱ्या सामन्यात शतकवीर होण्याचा मान पटकावला. त्याने ४७ चेंडूत ९ चौकार आणि १० षटकारांसह नाबाद १२० धावांची खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८६ चेंडूत २१० धावांची भागीदारी केली. या दोघांची विक्रमी शतकं आणि भागीदारीच्या बळावर भारतीय संघाने २८३ धावांचा डोंगर उभारला.