IND vs ENG 1st T20I Highlights in Marathi: अभिषेक शर्माच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडविरूद्ध भारताने ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. भारताच्या गोलंदाजांनी इंग्लंड संघाच्या धावांवर असा काही अंकुश ठेवला की त्यांना पुनरागमानाची संधीच दिली नाही. अर्शदीप सिंग आणि वरूण चक्रवर्तीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडला १३२ धावांत सर्वबाद केले. १३३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संजू सॅमसनने भारताला वेगवान सुरूवात करून दिली. दुसऱ्याच षटकात त्याने २२ धावा करत इंग्लंडच्या सर्वाेत्कृष्ट गोलंदाजाची धुलाई केली.

संजू सॅमसनने इंग्लंडमध्ये कसोटीत आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करत हॅटट्रिक घेणाऱ्या गस अॅटकिन्सनची चौकार-षटकारांसह धुलाई केली. संजूने ४ चौकार आणि एका षटकारासह त्याच्या गोलंदाजीची पार भिंगरीच उडवली. यानंतर इंग्लंडने त्याच्या जागी पुढील षटक टाकण्यासाठी दुसऱ्या गोलंदाजाला पाचारण केले.

auto driver who helped saif ali khan says not able to work
सैफला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षा चालकाने व्यक्त केली नाराजी; म्हणाला, “मी घाबरलोय कारण…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Father of Saif stabbing accused speaks about missing legal documents after the incident.
Saif Ali Khan : सैफवरील हल्ल्यानंतर हल्लेखोराचा पहिला फोन कोणाला? वडील म्हणाले, “आमचा मुलगा असा…”
dharavi adani land loksatta
३१९ कोटी रुपयांत ५८ एकर भूखंड अदानींकडे, धारावीकर मुलुंडवासीयांचे शेजारी
Guillain-Barré Syndrome
Guillain-Barre Syndrome : पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे रुग्ण वाढले, बाधितांमध्ये सर्वाधिक लहान मुले; वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना
Elon Musk and Sam Altman in conflict over the $500 billion AI project announced by Donald Trump.
Donald Trump : “त्यांच्याकडे पैसेच नाहीत”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच मोठ्या घोषणेची Elon Musk यांनी उडवली खिल्ली
Saamana critiques Shiv Sena leadership on Balasaheb Thackeray’s birth anniversary, targeting the Shinde faction.
“शिवसेनारूपी कवचकुंडले मोडून ती तोतया शिंदेंच्या हाती सोपवली”, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी ठाकरे गटाची टीका
Saif Ali Khan Attacked
Saif Ali Khan Attacked : तलावात दीड तास शोधाशोध अन् पोलिसांच्या हाती मोठा पुरावा; सैफ अली खान हल्ला प्रकरणात महत्वाची माहिती समोर

संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. पहिल्या षटकात संजूने सर्व चेंडू खेळून केवळ एक धाव केली. मात्र त्याच्या बॅटने दुसऱ्याच षटकात वादळी फलंदाजी केली. भारतीय डावातील दुसरे षटक टाकण्याची जबाबदारी गस ऍटकिन्सनवर देण्यात आली. पण इंग्लंडला हे षटक चांगलेच महागात पडले. ॲटकिन्सनच्या पहिल्या दोन चेंडूंवर संजूने चौकार मारले. तिसरा चेंडू डॉट बॉल होता. यानंतर सॅमसनने चौथ्या चेंडूवर दणदणीत षटकार ठोकला. सॅमसनने पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर चौकार लगावत एकाच षटकात एकूण २२ धावा केल्या. अशारितीने संजू सॅमसनने दुसऱ्याच षटकात महत्त्वाच्या गोलंदाजाविरूद्ध अशी खेळी करत इंग्लंडला दणका देत दबाव टाकला.

सॅमसनने आपल्या डावाची चांगली सुरुवात केली पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. वेगवान सुरुवात करूनही संजू सॅमसन लवकर पॅव्हेलियनमध्ये परतला. संजूने २०चेंडूत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २६ धावा केल्या. जोफ्रा आर्चरने त्याला ऍटकिन्सनकरवी सीमारेषेजवळ झेलबाद केले.

गस ॲटकिन्सन हा त्याच्या कारकिर्दीतील केवळ चौथा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. त्याला अजूनही या फॉरमॅटचा फारसा अनुभव नाही. पण त्याने कसोटी क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केलंय. क्रिकेटच्या या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये त्याने हॅटट्रिकही आपल्या नावे केली आहे. इंग्लंडच्या या वेगवान गोलंदाजाने २०२४ च्या अखेरीस ही कामगिरी केली आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना वेलिंग्टन येथे खेळला गेला. यामध्ये त्याने न्यूझीलंडचे तीन फलंदाज नॅथन स्मिथ, मॅट हेन्री आणि टिम साऊदी यांना एकापाठोपाठ एक बाद करत हॅटट्रिक घेत इतिहास घडवला.

Story img Loader