India vs Bangladesh 3rd T20I Updates in Marathi: हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर संजू सॅमसन खळबळ उडवून दिली आहे. बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात संजूने तुफानी शैलीत फलंदाजी करत अवघ्या २२ चेंडूत अर्धशतक झळकावले. तर नंतर अवघ्या ४० चेंडूत शतक झळकावत रोहित शर्माचा सर्वात मोठा विक्रम मोडला आहे.

संजू सॅमसन बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरला होता, परंतु त्याने हैदराबादमध्ये अप्रतिम पुनरागमन केले आणि त्याच्या टी-२० क्रिकेट कारकिर्दीतील पहिले शतकही झळकावले. संजूने २०१५ मध्ये त्याच्या T20I क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली आणि ९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर त्याने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये शतक झळकावण्यात यश मिळवले आहे. एवढेच नाही तर कारकिर्दीतील ३३ व्या सामन्यात पहिले शतक झळकावले.

बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरताच संजू सॅमसनने आक्रमक फलंदाजीला सुरूवात केली. त्याने अवघ्या २२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर त्याने फटकेबाजीचा वेग वाढवला आणि त्याने या सामन्यात ४० चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि यादरम्यान त्याने ८ षटकार आणि ९ चौकारही लगावले.

संजू सॅमसन भारतासाठी T20I क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ४० चेंडूत शतक झळकावून सूर्यकुमार यादवला तर ४५ चेंडूत शतक झळकावत ४५ चेंडूत शतक झळकावणाऱ्या सूर्यकुमार यादवला मागे टाकले. भारतासाठी टी-२० मधील सर्वात जलद शतक रोहित शर्माच्या नावावर आहे, ज्याने ३५ चेंडूत हे शतक झळकावले. तर बांगलादेशविरूद्ध टी-२० क्रिकेटमध्ये २२ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक करणारा पहिला खेळाडू ठरला आहे, ज्याने रोहित शर्माला मागे टाकलं आहे. रोहित शर्माने २३ चेंडूत हे अर्धशतक केले होते.

T20I सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणारे फलंदाज (चेंडू).

३५ – रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका, २०१७
४० – संजू सॅमसन विरुद्ध बांगलादेश, २०२४
४५ – सूर्यकुमार यादव विरुद्ध श्रीलंका, २०२३
४६ – केएल राहुल विरुद्ध वेस्ट इंडिज, २०१६
४६ – अभिषेक शर्मा विरुद्ध झिम्बाब्वे, २०२४

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान T20 शतक

३५ – डेव्हिड मिलर (SA) विरुद्ध BAN, पॉचेफस्ट्रूम, २०१७
३५ – रोहित शर्मा (IND) वि एसएल, इंदूर, २०१७
३९ – जॉन्सन चार्ल्स (WI) विरुद्ध SA, सेंच्युरियन, २०२३
४० – संजू सॅमसन (IND) विरुद्ध BAN, हैदराबाद, २०२४
४२ – हजरतुल्ला झाझाई (AFG) विरुद्ध IRE, डेहराडून, २०१९
४२ – लियाम लिव्हिंगस्टोन (ENG) विरुद्ध PAK, ट्रेंट ब्रिज, २०२१