Sanju Samson talks about the challenges of being an Indian cricketer: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने २०० धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी उत्कृष्ट होती. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत वादळी अर्धशतक झळकावले. या सामन्यानंतर संजू सॅमसनने भारतीय क्रिकेटपटू म्हणून येणाऱ्या आव्हानांचा उल्लेख केला.

आपल्या देशासाठी योगदान देणे खरोखरच खूप छान वाटते –

पहिल्या डावानंतर यजमान प्रसारकांशी बोलताना संजू सॅमसन म्हणाला, “मैदानावर थोडा वेळ घालवणे, काही धावा करणे आणि आपल्या देशासाठी योगदान देणे खरोखरच खूप छान वाटते. वेगवेगळ्या गोलंदाजांसाठी माझ्या वेगवेगळ्या योजना होत्या. मला माझे फूटवर्क वापरायचे होते आणि गोलंदाजांच्या लेन्थवर वर्चस्व गाजवायचे होते.”

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
Alzarri Joseph fined by ICC for abusing fourth umpire in WI-BAN ODI Month after two-match ban for on-field tiff
Alzarri Joseph: अल्झारी जोसेफला दोन सामन्यांच्या बंदीनंतर ICC ने ठोठावला दंड, पंचांना केली होती शिवीगाळ
Krunal Pandya in Pushpa 2 Tarak Ponappa looks like Indian Cricketer Know The Truth Behind Viral Photos
Pushpa 2: ‘पुष्पा २’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत भारताचा क्रिकेटपटू? व्हायरल फोटोंमागचं काय आहे सत्य?
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य

भारतीय क्रिकेटपटू बनणे आव्हानात्मक –

सॅमसनने पुढे टीम इंडियाचा खेळाडू म्हणून त्याच्यासमोर येणाऱ्या आव्हानांचा उल्लेख केला. तो म्हणाला की “भारतीय क्रिकेटपटू असणे ही एक आव्हानात्मक गोष्ट आहे (विविध बॅटिंग पोझिशनमध्ये खेळण्यासाठी जुळवून घेण्याबद्दल बोलला). मी गेली ८-९ वर्षे देशांतर्गत क्रिकेट खेळलो आहे आणि भारतासाठी परदेशात आणि मायदेशात खेळलो आहे, त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या स्थानांची थोडीशी समज मिळते. हे तुम्हाला किती षटके मिळतील याविषयी आहे, फलंदाजीच्या स्थानाबद्दल नाही. त्यामुळे तुम्हाला त्यानुसार तयारी करावी लागेल.”

हेही वाचा – IND vs WI: ”आलिशान नकोत, किमान मूलभूत सुविधा तरी…”; हार्दिक पांड्याने वेस्ट इंडिजवर बोर्डावर व्यक्त केली नाराजी

सॅमसनने गिलसोबत केली शानदार भागीदारी –

तिसऱ्या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या विकेटनंतर फलंदाजीला आलेल्या संजू सॅमसनने डाव सांभाळला आणि हळू हळू पुढे नेला. त्याने सामन्यात ४१ चेंडूत ५१ धावा केल्या. या दरम्यान त्याने २ चौकार आणि ४ षटकारही लगावले. सॅमसनचे वनडेतील हे तिसरे अर्धशतक आहे. त्याचबरोबर त्याने शुबमन गिलसोबत तिसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली.

हेही वाचा – ODI WC 2023: भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलली, आता ‘या’ दिवशी रंगणार हाय-व्होल्टेज सामना

संजू सॅमसनची एकदिवसीय कारकीर्द –

संजू सॅमसनने २०२१ मध्ये वनडे कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने आतापर्यंत १३ एकदिवसीय सामने खेळले असून १२ डावात ५५.७१च्या सरासरीने ३९० धावा केल्या आहेत. दरम्यान, त्याचा स्ट्राइक रेट १०४.०० आहे. त्याने आपल्या मर्यादित एकदिवसीय कारकिर्दीत ३ अर्धशतकेही झळकावली आहेत. या फॉरमॅटमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ८६ आहे, जी त्याने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केली होती.

Story img Loader