Sanju Samson Tilak Varma Smash World Record in T20I: भारतीय संघाने पुन्हा एकदा टी-२० क्रिकेटमध्ये बेधडक फलंदाजी करत टी-२० क्रिकेटमधील दुसरी सर्वाेच्च धावसंख्या उभारली आहे. संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या शतकांच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध फक्त १ विकेट गमावत २८३ धावांचा पर्वत उभारला. संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी वादळी फलंदाजीच्या जोरावर सामन्यात विश्वविक्रम केले आहेत.

संजू सॅमसनने दोन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा शतक झळकावलं आहे. तर तिलक वर्माने लागोपाठ दुसरं शतक झळकावलं आहे. संजू-तिलकने २१० धावांची विक्रमी भागीदारी रचली. तर अनेक विविध विक्रम टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या आपल्या नावे केले आहेत.

Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
Kalidas hirve , Vasai National Marathon Competition,
वसईत रंगली राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा, साताऱ्याचा कालिदास हिरवे विजेता
Jasprit Bumrah becomes first bowler to pick 50 Test wickets in 2024 joins Kapil Dev Zaheer Khan in elite list
IND vs AUS: जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीची कमाल, २०२४ मध्ये कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज
Nitish Reddy on Turning Point of Career Said After I Saw my Father Cry Over Financial Struggle Watch Video
Nitish Reddy: “मी वडिलांना रडताना पाहिलं अन्…”, नितीश रेड्डीने सांगितला जीवनातील टर्निंग पॉईंट; विराटबाबत पाहा काय म्हणाला?

हेही वाचा – IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी

संजू-तिलकने विक्रमांची लावली रांग

  • संजू सॅमसनने आपल्या टी-२० कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले आणि त्याने ही ३ शतकं २०२४ मध्ये केली आहेत. अशाप्रकारे, एकाच वर्षात आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ३ शतकं करणारा तो पहिला फलंदाज ठरला.
  • संजू सॅमसन एकाच मालिकेत दोन शतकं करणारा भारताचा पहिला फलंदाज ठरला, तर काही वेळातच तिलक वर्मानेही त्याच्या विक्रमाची पुनरावृत्ती केली आणि असे करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला. या दोघांपूर्वी संपूर्ण जगात केवळ इंग्लंडचा फिल सॉल्ट असा पराक्रम करू शकला आहे.
  • तिलक वर्माने आपल्या टी-२० कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले आणि लागोपाठ त्याचे दुसरे शतक आहे. सेंच्युरियनमध्येही त्याने शतक झळकावले. अशाप्रकारे, संजू नंतर, सलग दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकं करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला.
  • तिलकने अवघ्या ४१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे, जे रोहित शर्मा (३५) आणि संजू सॅमसन (४०) नंतर भारतासाठी या फॉरमॅटमधील तिसरे जलद शतक आहे.
  • टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत संजू सॅमसन तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या पुढे कर्णधार सूर्यकुमार यादव (४) आणि माजी कर्णधार रोहित शर्मा (५) आहेत.
  • संजू आणि तिलक यांनी एकाच सामन्यात शतकं झळकावली आणि अशा प्रकारे, पूर्ण सदस्य देशांमध्ये (म्हणजेच कसोटी क्रिकेट खेळणारे देश) टी-२० आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच एका संघातील दोन खेळाडूंनी शतकं केली आहेत.
  • संजू आणि तिलकने दुसऱ्या विकेटसाठी २१० धावांची (नाबाद) भागीदारी केली, जी आंतरराष्ट्रीय टी-२० इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी आहे. खरं तर, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात २००हून अधिक धावांची भागीदारी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • टीम इंडियाने आपल्या डावामध्ये एकूण २३ षटकार ठोकले आहेत, जो टी-२० मध्ये एक नवा विक्रम आहे. यापूर्वी भारत, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानने प्रत्येकी २२ षटकार मारले होते.
  • या मालिकेत तिलक वर्मा आणि संजू यांनी मिळून एकूण ४ शतकं केली आहेत. एखाद्या संघाने मालिकेत ४ शतकं झळकावण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • टीम इंडियाची २८३ धावांची धावसंख्या दोन पूर्ण सदस्य देशांदरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यांमधली दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. सर्वोच्च धावसंख्येचा (२९७) विक्रमही भारताच्या नावावर आहे, जो गेल्या महिन्यातच बांगलादेशविरुद्ध आला होता.

Story img Loader