झिम्बाब्वे दौऱयातील पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांत चमकदार कामगिरी करणाऱया भारतीय संघाच्या अंबाती रायुडूला दुखापतीमुळे दौऱयातील उर्वरित सामन्यांना मुकावे लागणार आहे. झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱया एकदिवसीय सामन्यात रायुडू जायबंदी झाला. रायुडूच्या मांडीचे स्नायू ताणले गेल्याने त्याला दोन ते तीन आठवड्यांच्या आरामाची आवश्यकता असल्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या उर्वरित सामन्यांसाठी तो खेळू शकणार नसल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. रायुडूच्या जागी युवा क्रिकेटपटू संजू सॅमसनचा संघात समावेश करण्यात आला आहे. झिम्बाब्वे दौऱयातील उर्वरित एक एकदिवसीय सामना आणि दोन टी-ट्वेन्टी सामन्यांसाठी चमकदार कामगिरीची संधी संजू सॅमसनला आहे.
दरम्यान, अंबाती रायुडूने झिम्बाब्वे दौऱयातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात संघ अडचणीत असताना दमदार कामगिरी करीत शतकी खेळी साकरली होती. रायुडूच्या नाबाद १२४ धावांच्या बळावर भारतीय संघाला झिम्बाब्वेसमोर २५५ धावांचे आव्हान ठेवता आले होते. तर, दुसऱया सामन्यात रायुडूने ४१ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा