Sanju Samson Wife Charulatha Insta Story : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार सामन्यांच्या टी-२० मालिकेला दणदणीत विजयाने सुरुवात केली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन हिरो ठरला. भारतीय संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना गडी गमावून २०२ धावा केल्या. प्रत्युत्तरात यजमान संघ अवघ्या १४१ धावांत गारद झाला. संजू सॅमसनला त्याच्या शानदार शतकासाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. संजूच्या या खेळीनंतर त्याची पत्नी चारुलता रमेश हिने इन्स्टाग्रामवर एक खास स्टोरी शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात संजू सॅमसनच्या बॅटमधून दमदार शतक झळकावले. त्याने ५० चेंडूत १०७ धावांची शानदार खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. या खेळीत संजूने एकूण १० षटकार आणि ७ चौकार लगावले. अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याने ४७ चेंडूंत आपले दुसरे टी-२० शतक पूर्ण केले. या शानदार शतकानंतर पत्नी चारुलताने एक खास इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आणि संपूर्ण जगाला सांगितले की तिचा हिरो कोण आहे.

संजू सॅमसनच्या पत्नीची इन्स्टा स्टोरी व्हायरल –

संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार शतक झळकावले. यानंतर त्याची पत्नी चारुलता रमेश हिने संजूच्या शतकी खेळीसाठी एक खास इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. चारुलताने संजूचा फोटो शेअर केला आणि त्याचे सुपरहिरो म्हणून वर्णन करताना कॅप्शनमध्ये लिहिले, ‘मला कायम आवडणारा हिरो’. या फोटोसह चारुलताने बॅकग्राऊंडसाठी निवडलेले गाणेही जबरदस्त होते. तिने बॅकग्राऊंडला, ‘तेरा ध्यान किधर है, तेरा हीरो इधर है’ हे गाणे लावले आहे. संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांची धुलाई करत सलग दुसरे टी-२० शतक झळकावले. या शतकासह अनेक विक्रमाला गवसणी घातली.

हेही वाचा – Sanju Samson : ‘कारकीर्दीत बरेच चढ-उतार आले, पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनने ‘या’ दोन माणसांचे मानले आभार

संजू सॅमसनच्या टी-२० क्रिकेटमध्ये ७००० धावा पूर्ण –

संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात केवळ १०७ धावांची इनिंग खेळली नाही, तर टी-२० क्रिकेटमध्ये ७००० धावाही पूर्ण केल्या. संजूने त्याच्या २६९ व्या टी-२० डावात हा आकडा गाठला आहे. यासह तो जलद ७००० धावा पूर्ण करणारा भारताचा संयुक्त सातवा खेळाडू ठरला आहे. संजूने या बाबतीत टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी आणि दिनेश कार्तिक यांना मागे टाकले आहे. धोनीने ३०५ डावात ७००० टी-२० धावा पूर्ण केल्या होत्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanju samson wife charulatha ramesh insta story my forever favourite hero after he hits century against south africa vbm