Sanju Samson Dropped From World Cup Squad 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बॅकअप यष्टिरक्षक म्हणून इशान किशनचा संघात समावेश करण्यात आला आहे, मात्र संजू सॅमसनला संधी देण्यात आलेली नाही. तर केएल राहुलला मुख्य यष्टिरक्षक म्हणून संघाचा भाग बनवण्यात आले आहे. आता संघात स्थान न मिळाल्याने संजूचे चाहते सोशल मीडियावर संतापले आहेत.

आपल्या आवडत्या खेळाडूला विश्वचषकाच्या संघात स्थान न दिल्याने चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने ट्विट करताना लिहिले, “सॉरी संजू. प्रत्येक वेळी तुझ्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.” दुसर्‍या युजरने लिहिले, “प्रत्येक गोष्टीसाठी संजू सॅमसन धन्यवाद.” तसेच इतर चाहतेही संजूबद्दल आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

Duleep Trophy Ishan Kishan 7th first class century
इशान किशनचे झंझावाती शतकासह निवडसमितीला प्रत्युत्तर; दुलीप ट्रॉफी सामन्यात चौकार-षटकारांची लयलूट
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
chess olympiad india strongest team in budapest to win gold medal
सुवर्णयशाचे ध्येय! बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील भारताच्या मोहिमेस आजपासून प्रारंभ
Ajit Agarkar to Sent Musheer Khan on Australia Tour with India A Squad Just After 7 Matches Impressed by His Innings
Musheer Khan: मुशीर खानच्या खेळीवर अजित आगरकर फिदा; फक्त ७ सामने खेळूनही जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
Duleep Trophy 2024 Rishabh Pant joins Shubman Gill lead A team
ऋषभने आपल्या कृतीने जिंकली पुन्हा चाहत्यांची मनं, विरोधी संघाची रणनीती जाणून घेण्यासाठी केलं असं काही की…
Neeraj chopra qualified for the Diamond League Finals sport news
नीरज डायमंड लीग अंतिम फेरीसाठी पात्र
Najmul Shanto on Team India
Najmul Shanto : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’
unil Gavaskar statement regarding the series in Australia that India is expected to dominate sport news
भारताचेच वर्चस्व अपेक्षित! ऑस्ट्रेलियातील मालिकेबाबत गावस्करांचे भाकीत

२०१५ मध्ये केले होते आंतरराष्ट्रीय पदार्पण –

संजू सॅमसनने २०१५ मध्ये टी-२० सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याने भारतासाठी आतापर्यंत १३ एकदिवसीय आणि २४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वनडेत संजूचे आकडे खूपच चांगले आहेत. १२ डावात फलंदाजी करताना त्याने ५५.७१ च्या सरासरीने ३९० धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्याच्या बॅटमधून ३ अर्धशतके झळकली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या ८६* आहे.

हेही वाचा – World Cup 2023: विश्वचषकाच्या सामन्यांसाठी रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! प्लेइंग इलेव्हन निडण्यासाठी सेट केले ‘हे’ तीन पॅरामीटर्स

विश्वचषक २०२३ साठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, इशान किशन, सूर्यकुमार यादव.