Sanju Samson Dropped From World Cup Squad 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बॅकअप यष्टिरक्षक म्हणून इशान किशनचा संघात समावेश करण्यात आला आहे, मात्र संजू सॅमसनला संधी देण्यात आलेली नाही. तर केएल राहुलला मुख्य यष्टिरक्षक म्हणून संघाचा भाग बनवण्यात आले आहे. आता संघात स्थान न मिळाल्याने संजूचे चाहते सोशल मीडियावर संतापले आहेत.
आपल्या आवडत्या खेळाडूला विश्वचषकाच्या संघात स्थान न दिल्याने चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने ट्विट करताना लिहिले, “सॉरी संजू. प्रत्येक वेळी तुझ्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.” दुसर्या युजरने लिहिले, “प्रत्येक गोष्टीसाठी संजू सॅमसन धन्यवाद.” तसेच इतर चाहतेही संजूबद्दल आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
२०१५ मध्ये केले होते आंतरराष्ट्रीय पदार्पण –
संजू सॅमसनने २०१५ मध्ये टी-२० सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याने भारतासाठी आतापर्यंत १३ एकदिवसीय आणि २४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वनडेत संजूचे आकडे खूपच चांगले आहेत. १२ डावात फलंदाजी करताना त्याने ५५.७१ च्या सरासरीने ३९० धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्याच्या बॅटमधून ३ अर्धशतके झळकली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या ८६* आहे.
विश्वचषक २०२३ साठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, इशान किशन, सूर्यकुमार यादव.