Sanju Samson’s post goes viral on social media: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची १८ सप्टेंबर रोजी घोषणा करण्यात आली. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात केएल राहुल संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. शेवटच्या सामन्यात सर्व वरिष्ठ खेळाडूंचे पुनरागमन होणार आहे. ऋतुराज गायकवाडचाही पहिल्या दोन सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, पुन्हा एकदा संजू सॅमसनला टीम इंडियातून वगळण्यात आले आहे. यानंतर संजू सॅमसनची एक पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

भारतीय संघात निवड न झाल्याने निराश झालेल्या संजू सॅमसनने फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याच्या अधिकृत अकाऊंटवर हसतमुख असलेला इमोजी पोस्ट केला आहे. या स्मायलीच्या पोस्टनंतर सॅमसन प्रत्येक आव्हानासाठी सज्ज असल्याचे समजते. त्याचबरोबर त्याने इन्स्टाग्रामवरही एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने आपल्या एक फोटो शेअर करत लिहले, “ते जे आहे ते आहे !! मी पुढे जाणे निवडतो”. या सोबत स्मायली इमोजी पोस्ट केला आहे.

India wins the match as well as the series against South Africa
भारताचा दणदणीत विजय; तिलक वर्मा व संजू सॅमसनची धमाकेदार कामगिरी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Suryakumar Yadav won the hearts of fans video viral
Suryakumar Yadav : याला म्हणतात देशभक्ती… देशाचा अपमान होताना पाहून सूर्यकुमार यादवने केलं असं काही की, तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’

इरफान पठाणने व्यक्त केली नाराजी –

संघाची घोषणा झाल्यानंतर पठाणने एक्स (ट्विटर) अॅपवर एक पोस्ट केली होते, ज्यामध्ये त्याने म्हटले की, “जर मी संजू सॅमसनच्या जागी असतो तर आज मी खूप निराश झालो असतो…” संजू सॅमसन, ज्याची वनडेमध्ये सरासरी ५५ आहे, त्याने १ ऑगस्ट रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.

हेही वाचा – World Cup 2023: विश्वचषकासाठी खास पाहुण्यांच्या यादीत रजनीकांत यांचा समावेश, जय शाहांनी दिले ‘Golden Ticket’

संजू सॅमसनचा वनडेतील कामगिरी –

जुलै २०२१ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून, संजू सॅमसनने २ वर्षांत भारतासाठी केवळ १३ सामने खेळले आहेत. संजूने १२ एकदिवसीय डावात ५५.७१ च्या सरासरीने ३९० धावा केल्या आहेत, ज्यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यात संजूचा स्ट्राईक रेटही १०० च्या वर आहे, परंतु हे आकडे असूनही निवडकर्ते सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मासारख्या खेळाडूंना प्राधान्य देत आहेत. सूर्यकुमार यादव वनडेत सातत्याने फ्लॉप ठरला आहे, तर तिलक वर्माने आशिया चषकात वनडे पदार्पण केले आहे.

रोहित शर्मा आणि बीसीसीआयवर चाहत्यांचा गंभीर आरोप –

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात सॅमसनची निवड न केल्याने चाहत्यांनी बीसीसीआयवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय संघाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असलेल्या सॅमसनबाबत चाहत्यांचे मत आहे की, बोर्ड या खेळाडूशी भेदभाव करत आहे. त्याच वेळी, काही चाहत्यांचे म्हणणे आहे की रोहित फक्त त्याच्या आवडत्या खेळाडूंना संधी देत ​​आहे.

हेही वाचा – Asian Games Cricket Schedule: टीम इंडिया थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळणार, जाणून घ्या महिला आणि पुरुष संघाचे वेळापत्रक

आशिया कप २०२ साठी संजूला टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आले नाही, तर रोहितने सूर्यकुमार आणि तिलक यांची संघात निवड केली. संजू आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार आहे, तर सूर्यकुमार आणि तिलक आयपीएलमध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्समध्ये खेळतात.