India vs South Africa series, Sanju Samson: दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विजय हजारे ट्रॉफीमध्ये संजू सॅमसनने दमदार कामगिरी केली होती. केरळकडून खेळताना त्याने रेल्वे संघाविरुद्ध १३९ चेंडूत १२८ धावांची नाबाद खेळी खेळली. मात्र, सॅमसनची ही खेळी व्यर्थ ठरली. आपल्या शतकी खेळीने केरळला तो विजयापर्यंत नेऊ शकला नाही आणि संघाला रेल्वेविरुद्ध १८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बंगळुरू येथील किनी अ‍ॅरेना स्पोर्ट्स ग्राऊंडवर झालेल्या विजय हजारे ट्रॉफी सामन्यात संजू सॅमसनने चमकदार कामगिरी केली आहे. रेल्वेसमोर २५५ धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने केरळ संघासाठी कठीण काळात शतक झळकावले. १३९ चेंडूंचा सामना करताना सॅमसनने ६ षटकार आणि ८ चौकारांसह १३९ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने श्रेयस गोपालबरोबर चांगली भागीदारी केली, पण केरळ संघ ५० षटकात केवळ २३७/८ धावाच करू शकला. मात्र, संजू सॅमसनच्या या शानदार शतकी खेळीमुळे टीम इंडियात त्याची दावेदारी पक्की झाली आहे, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याला प्लेईंग-११मध्ये नक्कीच स्थान मिळू शकते.

एबी डिव्हिलियर्सने कौतुक केले आहे

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, “आफ्रिकेतील परिस्थिती त्यांना मदत करेल आणि त्यांच्यासाठी ही एक चांगली मालिका असावी.” एबी डिव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब चॅनलवर आगामी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत सांगितले की, “संजू सॅमसनची निवड झाल्याचे पाहून खूप आनंद झाला. तो दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्टीवर चांगली मदत फलंदाजी करेल आणि इथल्या वातावरणाचा आनंद घेईल. जेव्हा तो फलंदाजी करतो तेव्हा तो बराच वेळ एक बाजू लावून धरतो. थोडी उसळी आणि स्विंग होत असलेल्या खेळपट्टीवर सर्व फलंदाजांची कसोटी लागणार आहे. मात्र, मला वाटते की संजू आणि त्याचे सहकारी चांगली कामगिरी करतील. सॅमसनची निवड झाल्याने संघात तुम्हाला विकेटकीपिंगचा अतिरिक्त पर्यायही मिळतो, ही टीम इंडियासाठी जमेची बाजू आहे.”

हेही वाचा: World Cup: विश्वचषक फायनलमध्ये टीव्हीवर का दाखवले नाही? नीरज चोप्राने केले सूचक विधान; म्हणाला, “मला जे हवे होते त्याबद्दल…”

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा संघ:ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चाहर

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanju samsons strong batting before the south africa tour scored a brilliant century avw