भारतीय संघाचा महत्त्वाचा असणारा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याला आगामी आयसीसी टी२० विश्वचषकातून वगळण्यात आले होते. बीसीसीआयने नुकतीच त्याची न्यूझीलंड अ संघाच्या दौऱ्यासाठी भारतीय अ संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली त्या पार्श्वभूमीवर त्याने हे विधान केले आहे. सॅमसनने भारतीय क्रिकेटमधील आपल्या पुनरागमनाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. तसेच केएल राहुल आणि रिषभ पंत या यष्टीरक्षक फलंदाजांचा पर्यायी खेळाडू म्हणून आपल्याबद्दल होत असलेल्या चर्चांवरही तो बोलला आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बीसीसीआयने टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या १५ सदस्यीय संघात ऋषभ पंत दिनेश कार्तिक या दोन यष्टिरक्षकांची निवड केली. फॉर्मात नसतानाही ऋषभची निवड अन् सातत्यपूर्ण कामगिरीकरून संजूला डावलल्याने त्याचे चाहते प्रचंड संतापले होते. यावर एका व्हिडिओतून “मी नेहमी सकारात्मक विचार करतो, सहकाऱ्यांशी स्पर्धा म्हणजे देशाचा पराभव आहे”, असे म्हणत त्याने समाज माध्यमांवर होत असलेल्या चर्चांना उत्तर दिले आहे.

तसेच तो पुढे म्हणतो की, “मी खूप भाग्यवान आहे की, ५वर्षांनंतर मला भारतीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळाली. जगातील सर्वोत्कृष्ट संघात पुनरागमन करणे सोपे नसते. मी स्वत:ला खूपच नशीबवान समजतो.” ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी२० मालिकेसाठीही दुर्लक्षित ठेवण्यात आले आहे. सोशल मीडियावर सातत्याने चर्चा होत असते की, सॅमसन भारतीय संघात केएल राहुल किंवा ऋषभ पंतला ऐवजी खेळेल अशी काही माजी दिग्गज खेळाडूंनी आशा व्यक्त केली होती.

हेही वाचा   :   न्यूझीलंडच्या माजी महान फिरकीपटूने सांगितले अश्विन ऑस्ट्रेलियात का होऊ शकतो एक्स फॅक्टर, जाणून घ्या

याविषयी बोलताना सॅमसन म्हणाला की, “सोशल मीडियावर खूप काही चालू आहे. खूप काही म्हटले जात आहे की, सॅमसनला केएल राहुल आणि ऋषभ पंतच्या जागी निवडले गेले पाहिजे. परंतु याबाबत माझे विचार एकदम स्पष्ट आहेत. राहुल आणि पंत दोघेही भारतीय संघासाठी खेळत आहेत. जर मी माझ्याच संघ सहकाऱ्यांसोबत प्रतिस्पर्धा करू लागलो, तर असे करत मी माझ्याच देशाचा अपमान करेल. याचसाठी मी नेहमी सकारात्मक विचार ठेवत असतो.”