#HappyBirthdaySachin : भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देव मानतात. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा आज वाढदिवस… २०१३ साली मुंबईच्या वानखेडे मैदानावर तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण त्याची प्रत्येक खेळी ही क्रिकेटप्रेमींच्या मानवर अजूनही अधिराज्य गाजवत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतक झळकावणाऱ्या पहिल्या आणि एकमेव खेळाडूच्या नावावर अनेकविध विक्रम आहेत. त्याने २४ वर्षांच्या कारकिर्दीत दमदार कामगिरी केली असून सध्या क्रिकेटच्या मैदानावर उतरणारा प्रत्येक नवा क्रिकेटपटू त्याला आदर्श मानतो.

Sachin Fights Coronavirus! परळच्या ‘जबरा फॅन’कडून सचिनला अनोख्या शुभेच्छा

सचिन फक्त उत्तम क्रिकेटपटूच नव्हे, तर एक चांगला पती आणि वडिल देखील आहे. सचिनची कन्या सारा हिने तिच्या वडिलांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. साराने सचिन आणि तिचे २ जुने फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केले आहेत. त्या फोटोंपैकी एका फोटोवर तिने सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत, तर दुसऱ्या फोटोवर तिने सचिनला लव्ह यू बाबा म्हटले आहे.

९० वेगवेगळ्या मैदानांवर खेळणारा एकमेव खेळाडू; जाणून घ्या सचिनचे काही खास फोटो

करोनाच्या तडाख्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण सचिनचे चाहते मात्र आपल्या देवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. सचिनचा जबरा फॅन असलेला अभिषेक साटम याने एक अतिशय अप्रतिम अशी कलाकृती साकारली आहे. त्याने त्या कलाकृतीचा व्हिडीओ शेअर करत सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत.

#HappyBirthdaySachin : खेळातला सचिन अन् मैदानाबाहेरचा सचिन

दरम्यान, सचिनने यंदा देशात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि खडतर काळात करोनाशी लढणाऱ्या डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांसाठी यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. सचिनच्या जवळच्या मित्राने पीटीआय वृत्तसंस्थेला याविषयी माहिती दिली. “ही वेळ कोणतंही सेलिब्रेशन करण्याची नाही. सध्याच्या काळात डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, पोलिस कर्मचारी करोनाचा सामना करण्यासाठी घराबाहेर आहेत. अशा लोकांचा सन्मान करण्यासाठी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचं सचिनने ठरवलं आहे”, असे सचिनच्या मित्राने सांगितलं.

 

Story img Loader