मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा प्रतिभावान फलंदाज सर्फराज खान विजय हजारे ट्रॉफीच्या अनेक सामन्यांपासून दूर असू शकतो. पोटदुखीच्या त्रासानंतर सरफराज खानला रांची येथील रुग्णालयात दाखल करावे लागले. सध्या त्याचा मुंबई संघ विजय हजारे ट्रॉफी गटाचा सामना खेळण्यासाठी रांचीमध्ये आहे. सर्फराज रविवारी सर्व्हिसेसविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही, ज्यात त्याच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सरफराजला किडनी स्टोन आहे, ही किरकोळ समस्या आहे. सोमवारी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. सरफराज खानचे वडील नौशाद खान यांनी क्रिकबझ या वेबसाइटला सांगितले की, ‘हे लहान आहे पण खूप वेदना देते. अनेक दिवसांपासून त्याला याचा त्रास होत होता. यामुळे त्याला खूप वेदना होत होत्या, त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. आता तो बरा आहे. सरफराजला रविवारी संध्याकाळी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याची अपेक्षा होती, पण खबरदारी म्हणून त्याला आणखी एक रात्र ठेवण्यात येईल.

George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Travis Head Statement on Mohammed Siraj Fight and Send Off Said I Said Well Bowled IND vs AUS 2nd Test
Travis Head on Siraj Fight: “मी म्हणालो चांगला चेंडू होता पण त्याने…”, सिराज आणि हेडमध्ये नेमका कशावरून झाला वाद? ट्रॅव्हिस हेडने सामन्यानंतर सांगितलं
Travis Head Fastest Century in Day Night Test Match IND vs AUS Adelaide Test
Travis Head: ट्रॅव्हिस हेडचे डे-नाईट कसोटीत सर्वात जलद शतक, स्वत:चा रेकॉर्ड मोडत केली मोठी कामगिरी; भारत बॅकफूटवर
IND vs AUS Controversial Umpiring Over R Ashwin LBW Appeal as Mitchell Marsh Given Out KL Rahul DRS b
IND vs AUS: राहुल आऊट अन् मार्श नॉट आऊट, तिसऱ्या पंचांचा पुन्हा एकदा भारताविरूद्ध निर्णय; मैदानात नेमकं काय घडलं?

मुंबईला पुढचा सामना महाराष्ट्राविरुद्ध खेळायचा आहे –

मुंबई संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्फराज मुंबईच्या महाराष्ट्राविरुद्धच्या पुढील सामन्यासाठी उपलब्ध असेल. संघाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘सरफराज तंदुरुस्त असणे अपेक्षित आहे. रुग्णालयात एक रात्र मुक्काम हा सावधगिरीचा निर्णय होता आणि गुरुवारच्या सामन्यात त्याच्या खेळण्याचा आम्हाला विश्वास आहे.’

हेही वाचा – PAK vs ENG: पाकिस्तानी पत्रकाराच्या ‘या’ पोस्टने भारतीय चाहत्याचा जीव आला होता धोक्यात, पाहा काय आहे प्रकरण

सर्फराज भारत अ संघासोबत बांगलादेश दौऱ्यावर जाऊ शकतो –

सर्फराज खान भारत अ संघासोबत बांगलादेश दौऱ्यावर जाऊ शकतो. भारत अ संघ बांगलादेश दौऱ्यावर कसोटी आणि मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारत अ संघाची निवड काही दिवसांत होणार आहे. बांगलादेश दौऱ्यासाठी सर्फराज भारत अ संघाचा भाग असेल अशी अपेक्षा आहे.

Story img Loader