धरमशाला कसोटी सामन्यात टीम इंडियाने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर इंग्लंडचा बॅझबॉलचा धुव्वा उडवला. इंग्लंडचा निम्मा संघ लंचब्रेकपूर्वीच पॅव्हेलियनमध्ये परतला होता आणि दुसऱ्या सत्राच्या तासाभरातच आणखी ३ विकेट गमावल्या. भारत हा सामना जिंकणार हे सर्वांनाच माहीत होते. पण यादरम्यानच जॉनी बेयरस्टोच्या प्रकरणानंतर टीम इंडियाच्या सर्फराझ खानने शोएब बशीरला असे काही ट्रोल केले की तो प्रसंग आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या सर्फराझ खानने इंग्लंडचा युवा ऑफस्पिनर शोएब बशीरला सल्ला दिला. “पटापट धावा करून सामना संपव आपण डोंगरावर बर्फ पाहायला जाऊ.” सर्फराझचे हे वाक्य स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाल्याने सर्वांनाच ऐकू गेले.

शोएब बशीर फलंदाजी करत असताना कुलदीप यादवच्या ३८व्या षटकात त्याच्या गुगलीसमोर बशीर गडबडताना दिसला. कसंबसं आपली विकेट वाचवण्यात त्याला यश आले. सर्फराझच्या त्या टिपण्णीनंतर काही षटकांतच रवींद्र जडेजाने आपल्या उत्कृष्ट इनस्विंगने बशीरला बाद केले. जडेजाकडून तो क्लीन बोल्ड झाला हे बशीरला कळलेच नाही आणि तो डीआरएस घेण्यासाठी जात होता. त्यानंतर दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या जो रूटने त्याला एलबीडब्ल्यू नसून बोल्ड झाल्याचे सांगितले. यानंतर बशीर पॅव्हेलियनकडे परतला.

रोहितमुळे बचावला सर्फराझ खान

धरमशाला कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शोएब बशीर फलंदाजीला आला तेव्हा ३८व्या षटकात कुलदीप यादवच्या चेंडूवर त्याने धारदार शॉट मारला. तेव्हा सर्फराझ शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षणासाठी तैनात होता. बशीरने मारलेल्या शॉटपासून तो स्वत:ला वाचवण्यापूर्वीच चेंडू त्याच्या हेल्मेटला लागला. हेल्मेटमुळे सर्फराझला काहीही झाले नाही, अन्यथा मैदानावर मोठी दुर्घटना घडू शकली असती. यानंतर रांची कसोटीतील रोहित शर्माचे बोलणे होता सर्फराझला नक्कीच आठवले असेल .

रांची कसोटी सामन्यात जेव्हा सर्फराझ सिली पॉइंटवर मैदानात उतरला तेव्हा त्याने हेल्मेट घातले नव्हते. पण रोहित शर्माने लगेचच सर्फराझला हिरोगिरी करायची नाही म्हणत हेल्मेट घालण्यास सांगितले. यानंतर त्याने हेल्मेट घातले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarfaraz khan badly trolls england spinner shoaib bashir in ind vs eng dharamsala test bdg
Show comments