Sarfaraz Khan Double Century: मुंबई क्रिकेट संघाचा विस्फोटक फलंदाज सर्फराझ खानने द्विशतक झळकावले आहे. सध्या सुरू असलेल्या इराणी कप २०२४ मध्ये मुंबई क्रिकेट संघाकडून खेळताना सर्फराझ खानने द्विशतक केले. मुंबई वि रेस्ट ऑफ इंडिया सामन्यात सर्फराझने २५५ चेंडूत २३ चौकार आणि ३ षटकारांसह २०० धावा केल्या. बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत सर्फराझ खानला भारतीय संघात संधी मिळाली होती. मात्र त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नाही. मात्र, आता त्याने इराणी चषकात आपल्या कामगिरीने खळबळ उडवून दिली.

सर्फराझ खान डावाच्या सुरुवातीपासूनच चांगल्या लयीत होता आणि कोणतीही जोखीम न घेता त्याने अवघ्या १५० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने कर्णधार अजिंक्य रहाणेबरोबर उत्कृष्ट भागीदारी रचली, ज्यामुळे मुंबई संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यात तो यशस्वी ठरला. त्याने अवघ्या २५३ चेंडूत २०० धावा पूर्ण केल्या आणि यादरम्यान त्याने २३ चौकार आणि तीन षटकार लगावले. त्याच्यामुळेच मुंबईचा संघ मोठी धावसंख्या गाठण्यात यशस्वी ठरला आहे.

Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Rohit Sharma Statement on Mohammed Siraj and Travis Head Fight in IND vs AUS 2nd Test
IND vs AUS: “मर्यादा ओलांडायला नको…”, रोहित शर्माने सिराज-हेडच्या वादात भारतीय गोलंदाजाची घेतली बाजू, सामन्यानंतर केलं मोठं वक्तव्य
Travis Head Statement on Mohammed Siraj Fight and Send Off Said I Said Well Bowled IND vs AUS 2nd Test
Travis Head on Siraj Fight: “मी म्हणालो चांगला चेंडू होता पण त्याने…”, सिराज आणि हेडमध्ये नेमका कशावरून झाला वाद? ट्रॅव्हिस हेडने सामन्यानंतर सांगितलं
Mohammed Siraj Throws The Ball on Marnus Labuschagne in Anger IND vs AUS Adelaide Test Watch Video
VIDEO: लबुशेनच्या ‘त्या’ कृतीमुळे मोहम्मद सिराज संतापला, थेट चेंडूच मारला फेकून; मैदानात नेमकं काय घडलं?

हेही वाचा – IND vs BAN: “भले आम्ही १०० वर ऑल आऊट झालो असतो पण…”, भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचं मोठं विधान, नेमकं म्हणाला तरी काय?

१ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या इराणी चषकाच्या सामन्यात मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात मुंबईने झटपट ४ विकेट लवकर गमावल्या. या सामन्यात मुंबईची सुरुवात खूपच खराब झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ ७ चेंडूत ४ धावा करून बाद झाला. यानंतर संघाने ३७ धावांत ३ विकेट गमावल्या. मात्र, त्यानंतर रहाणे आणि सर्फराझने जबाबदारी स्वीकारली आणि मुंबईसाठी मोठी भागीदारी केली. रहाणेचे शतक ३ धावांनी हुकले. त्याने २३४ चेंडूत ९७ धावा केल्या होत्या. त्यानंतर सर्फराझ खानने संघांच्या धावांची जबाबदारी स्वाकारली आणि दुसऱ्याच दिवशी मुंबईला ५०० धावांचा टप्पा गाठण्यात मोठी भूमिका बजावली.

हेही वाचा – IND vs BAN कसोटी मालिकेत २ बेस्ट फिल्डर, रोहित-सिराज-यशस्वी-राहुल; कोणाला मिळालं मेडल? पाहा VIDEO

सरफराजने २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण केले. यानंतर, त्याने एकूण ३ कसोटी सामन्यांमध्ये ५०.०० च्या सरासरीने २०० धावा केल्या आहेत, ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने ५० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४१८३ धावा आणि ३७ लिस्ट-ए सामन्यांमध्ये ६२९ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – ICC Rankings: जसप्रीत बुमराहने आर अश्विनकडून हिसकावला कसोटीतील नंबर वन गोलंदाजाचा मान

Story img Loader