Sarfaraz Khan Funny dance video viral in IND vs NZ 1st Test Match : बंगळुरू कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी खेळ सुरू होताच भारतीय संघाचा युवा खेळाडू सर्फराझ खानच्या बॅटमधून उत्कृष्ट शतकी खेळी पाहायला मिळाली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सर्फराझ ७० धावांवर नाबाद परतला होता. यानंतर चौथ्या दिवशी ऋषभ पंतबरोबर फलंदाजीला येत ११० चेंडूत आपले पहिले कसोटी शतक झळकावले. दरम्यान या शतकापूर्वी तो ऋषभला हातवारे करत मैदानात नाचताना दिसला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या सर्फराझने दुसऱ्या डावात सकारात्मक पद्धतीने फलंदाजी केली आणि वेगवान गतीने शतकी खेळी साकारली. त्याने ११० चेंडूचा सामना करताना १३ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार झळकावत आपले पहिले कसोटी शतक झळकावले. सर्फराझच्या कसोटी कारकिर्दीतील हा केवळ चौथा सामना आहे. या शतकापूर्वी त्याने या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान तीन वेळा अर्धशतकी खेळी साकारली होती.
सर्फराझ लाइव्ह सामन्यात नाचू लागला –
या सामन्यात एकवेळ अशी आली होती, जेव्हा सर्फराझ खानचे शतकही पूर्ण झाले नव्हते. पण तरीही तो मैदानात नाचताना दिसला. त्याचे झाले असे की, जेव्हा सर्फराझ खान ९५ धावांवर खेळत होता, तेव्हा त्याने ऑफसाइडला चेंडू टोलवत एक धाव घेतली. मात्र, यावेळी ऋषभ पंतला दुसरी धाव घ्यायची होती आणि त्याचे लक्ष नव्हते. त्यावेळी सर्फराझ ऋषभला सांगत होता की, दुसरी धाव घेता येणार नाही. कारण चेंडू न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात होता. त्यामुळे तो ऋषभला दुसरी धाव घेण्यापासून रोखण्यासाठी मैदानात नाचत हातवारे करत होता. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
शुबमन गिलच्या जागी संघात मिळाले स्थान –
बंगळुरू कसोटी सामन्यात, मानेच्या दुखापतीमुळे खेळत नसलेल्या शुबमन गिलच्या जागी सर्फराझ खानला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. गिल खेळत नसल्याने विराट तिसऱ्या क्रमांकावर खेळत आहे, तर सर्फराझ खान चौथ्या क्रमांकावर खेळत आहे. यापूर्वी बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान सर्फराझला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. न्यूझीलंडविरुद्धची ही कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी सर्फराझ खान इराणी ट्रॉफी सामना खेळण्यासाठी गेला होता, ज्यामध्ये त्याने द्विशतक झळकावले होते.