Sarfaraz Khan gave a befitting reply to BCCI by sharing a video on Instagram story: कसोटी सामन्यांव्यतिरिक्त भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या सरफराज खानला संघात स्थान मिळाले नाही, त्यानंतर सुनील गावस्कर, वसीम जाफर यांच्यासह अनेक माजी क्रिकेटपटूंनी प्रश्न उपस्थित केले.

याशिवाय सरफराज खानला या भारतीय संघात स्थान मिळायला हवे होते, असे सोशल मीडियावरील चाहत्यांचे मत आहे. मात्र, आता सरफराज खाननेच बीसीसीआयच्या निवडकर्त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. सरफराज खानने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त करताना बीसीसीआयला प्रत्युत्तर दिले आहे.

Nana Patole on Ravindra Dhangekar
Nana Patole: रवींद्र धंगेकर काँग्रेसचा हात सोडणार? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “काही लोक व्यावसायिक…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
salman khan did not select in vivah movie
‘विवाह’मध्ये सलमान खानऐवजी शाहिद कपूरला का घेतलं होतं? दिग्दर्शक म्हणाले, “त्या भूमिकेसाठी निरागसपणा…”
kareena kapoor
हल्ल्यानंतर सैफ अली खान आणि करीनाने मुलांसाठी घेतला मोठा निर्णय; पापाराझींना केली ‘ही’ विनंती
Urvashi Rautela
उर्वशी रौतेलाने ट्रोल करणाऱ्यांना दिलं उत्तर; म्हणाली, “लोक सलमान खान आणि शाहरूख खानला सोडत नाहीत तर…”
Saif Ali Khan attack case Mental health Titwala suspect
Video : सैफ अली खान हल्ला प्रकरणात पकडलेल्या टिटवाळ्यातील संशयित तरूणाच्या मनावर परिणाम? कुटुंबीयांची खंत
Junaid Khan sat outside at Ira Khan wedding
बहिणीच्या लग्नात कुटुंबाने दिली नाही कोणतीच जबाबदारी, बाहेर बसला होता जुनैद खान, कारण…
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? स्वतः सैफनेच पोलिसांना सांगितलं; जबाबात म्हणाला, “मी हल्लेखोराला…”

सरफराज खानने निवडकर्त्यांना दिले उत्तर!

सरफराज खान इन्स्टाग्राम स्टोरी

सरफराज खानने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सरफराज खानच्या रणजी ट्रॉफी हंगामातील हायलाइट्स आहेत. या स्टोरीच्या कॅप्शनमध्ये काहीही लिहिलेले नसले तरी, सोशल मीडिया चाहत्यांचे म्हणणे आहे की या युवा फलंदाजाने बीसीसीआयच्या निवडकर्त्यासाठी एक संदेश आहे. मात्र, सरफराज खानची स्टोरी सोशल मीडियावर सतत चर्चेत असते.

सरफराज खानची रणजी ट्रॉफीतील कामगिरी –

आकडेवारी दर्शवते की सरफराज खानने रणजी ट्रॉफी २०२३ हंगामातील ९ डावात ५५६ धावा केल्या. सरफराज खानची या मोसमात सरासरी ९२.६६ होती. तर या युवा फलंदाजाने ७२.४९ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. याशिवाय सरफराज खानने तीनवेळा शतकाचा टप्पा ओलांडला, असे असतानाही बीसीसीआयच्या निवड समितीकडून सातत्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

हेही वाचा – Pakistani Cricketer: मोहम्मद रिझवान रस्त्यावर नमाज अदा केल्यानंतर आता मक्केत साफसफाई करताना दिसला, VIDEO होतोय व्हायरल

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.

Story img Loader