World Test Championship Final 2023: इंडियन प्रीमियर लीग संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंडला जायचे आहे. टीम इंडियाला ७ ते ११ जून दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळायचा आहे, ज्यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या प्रतिष्ठेचा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. बीसीसीआयने १५ सदस्यीय संघाचीही घोषणा केली असून त्यात अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेला परत आणले आहे. मात्र आता फक्त ३ दिवसांनंतर बीसीसीआयने नवीन संघ जाहीर केला आहे. ज्यामध्ये ५ युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. जो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी (WTC फायनल) इंग्लंडला रवाना होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी आधी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर करण्यात आला आणि त्यानंतर बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची घोषणा केली. अंतिम सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर होणार आहे. संघाची घोषणा आधीच करण्यात आली होती, मात्र आता या संघाबाबत आणखी एक मोठे अपडेट समोर आले आहे. निवडलेल्या टीम इंडियाचे १५ सदस्य केवळ इंग्लंडला जाणार नसून, या दौऱ्यावर आणखी काही खेळाडू टीम इंडियासोबत राहू शकतात, अशी माहिती मिळाली आहे.

हेही वाचा: Women’s Contract: हरमनप्रीत कौरला लागली लॉटरी! BCCIकडून महिला खेळाडूंची केंद्रीय करार यादी जाहीर

‘या’ पाच खेळाडूंचे चमकले नशीब

सरफराज खान, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, नवदीप सैनी हे पाच जण इंग्लंडला जाणार आहेत, पण हे सर्व खेळाडू स्टँडबाय म्हणून जातील अशी माहिती आहे. टाइम्स ऑफ इंडियाने बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे की, “टीम इंडिया आधीच काही दिवस इंग्लंडला पोहोचेल आणि अंतिम सामन्यापूर्वी सराव सामना देखील खेळेल.

स्टँडबाय म्हणून जाणारे खेळाडू तेव्हाच संघात स्थान मिळवू शकतात जेव्हा मुख्य संघातील एखादा खेळाडू जखमी होतो किंवा खासगी कारणासाठी जातो किंवा आजारी पडतो. हे खेळाडू त्याचा बदली खेळाडू म्हणून जागा घेतील. संघाकडे कर्णधार रोहित शर्मा, के.एल. राहुल आणि शुबमन गिल हे तीन सलामीवीर असून, ऋतुराज गायकवाडचीही चर्चा आहे. दुसरीकडे, के.एस. भरतची यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे आणि गरज पडल्यास के.एल. राहुल देखील कीपिंग करू शकतो. परंतु आता स्टँडबाय खेळाडू म्हणून ऋतुराज गायकवाडचे नाव पुढे आले आहे, जो कीपिंग करू शकतो. वेगवान गोलंदाजीत गरज पडल्यास मुकेश कुमार आणि नवदीप सैनी ही पोकळी भरून काढण्याचे काम करतील.

हेही वाचा: IPL 2023: “अर्जुन तेंडुलकर हा अतिरिक्त गोलंदाज…”, हैदराबादचे माजी प्रशिक्षक टॉम मूडी यांच्या अजब विधानाने गोंधळ

टीम इंडियाचे खेळाडू स्वतंत्रपणे इंग्लंडला जाणार आहेत

दरम्यान, एका अहवालानुसार माहिती मिळत आहे की आयपीएल २०२३ मधील लीग टप्पा २१ मे रोजी संपेल. प्लेऑफमध्ये जाणारे चार संघ वगळता इतर सर्व संघांचे निवडक खेळाडू इंग्लंडला रवाना होतील. यानंतर जसजसे संघांचे सामने संपतील तसतसे खेळाडू इंग्लंडला जातील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarfaraz khan got a place in the team for wtc final 2 more dreaded batsmen will join have scored a double century avw