भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे. तेव्हापासून सरफराज खानचे नाव खूप चर्चेत आहे. सरफराज खान देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत आहे, मात्र त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळत नाही. अशात आता सरफराज खानने निवड समितीबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

निवडकर्त्यांनी सरफराजला बांगलादेश दौऱ्यावर संधी मिळण्याबाबत सांगितले होते, मात्र या दौऱ्यावर त्याला वरिष्ठ संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही, तर भारत अ संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याचवेळी त्यांनी निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांचीही भेट घेतल्याचे सांगितले.

George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Today is death anniversary of Nani Palkhiwala who secured fundamental rights in Kesavanand Bharti case
स्मरण एका महान विधिज्ञाचे…
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
ravi rana resign
अमरावती : नवनीत राणा म्‍हणतात, “…तर रवी राणा देखील राजीनामा देतील”
IND vs AUS Travis Head Reveals Discussion with Mohammed Siraj About Their Fight in 2nd test Watch Video
VIDEO: सिराज आणि हेडमध्ये नेमकं काय बोलणं झालं? सिराजने भांडण मिटवलं का? त्यावर हेड काय म्हणाला?
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
What Ashok Chavan Said About Congress?
Ashok Chavan : “रेवंथ रेड्डींकडे भोकर विधानसभेची जबाबदारी दिली होती, प्रचंड पैसा…”; श्रीजया यांच्या विजयानंतर काय म्हणाले अशोक चव्हाण?

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सरफराज म्हणाला, ”बंगळुरूमध्ये रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मी शतक ठोकले, तेव्हा मी निवडकर्त्यांना भेटलो. मला सांगण्यात आले की ‘तुला बांगलादेशात संधी मिळेल. त्यासाठी तयार राहा.’ अलीकडेच मी चेतन शर्मा सर (मुख्य निवडकर्ता) यांना भेटलो, जेव्हा आम्ही मुंबईत हॉटेलमध्ये चेक इन करत होतो. त्यांनी मला निराश न होण्यास आणि माझी वेळ येईल असे सांगितले. चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतो. तू खूप जवळ आहेस. तुला संधी मिळेल. त्यामुळे मी दुसरी महत्त्वाची खेळी खेळली, तेव्हा मला अपेक्षा होती.”

हेही वाचा – VIDEO: विराट आणि शुबमन गिलने आपल्या यशाचे श्रेय ‘या’ तीन सदस्यांना दिले, पाहा कोण आहेत?

सरफराज पुढे म्हणाला, ”जेव्हा संघ जाहीर झाला आणि माझे नाव नव्हते, तेव्हा मला खूप वाईट वाटले. या जगात माझ्या जागी कोणीही दुःखी झाले असते, कारण मला निवडले जाईल अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. काल, आम्ही गुवाहाटीहून दिल्लीला जात असताना दिवसभर मी उदास होतो. हे काय आणि का घडलं असा प्रश्न मला पडत होता. मला खूप एकटं वाटत होतं.”

मुंबईचा संघ मंगळवारपासून अरुण जेटली स्टेडियमवर दिल्लीविरुद्ध रणजी ट्रॉफी सामना खेळणार आहे.

हेही वाचा – IND vs SL: एकदिवसीय क्रिकेटचा अंत होत आहे का? ऐतिहासिक सामन्यानंतर युवराज सिंगने उपस्थित केला प्रश्न

सरफराज खानच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीवर नजर टाकल्यास, त्याने ३६ सामन्यांमध्ये ८०.४७ च्या अविश्वसनीय सरासरीने ३३८० धावा केल्या आहेत. सरफराजची बॅट गेल्या काही वर्षांपासून रणजी क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहे. २०१९-२० हंगामात त्याने १५४.६६च्या सरासरीने ९२८ धावा केल्या. त्याचबरोबर तर २०२१-२२ मध्ये त्याने १२२.७५ च्या सरासरीने ९८२ धावा केल्या.

Story img Loader