संयुक्त अरब अमिरातीमध्ये नुकत्याच झालेल्या युवा विश्वचषक (१९ वर्षांखालील) क्रिकेट स्पध्रेत सातत्यपूर्ण फलंदाजीचे प्रदर्शन करणाऱ्या सर्फराझ खानचा मुंबईच्या वरिष्ठ संघात समावेश करण्यात आला आहे. राजकोटमध्ये सध्या सुरू असलेल्या पश्चिम विभागीय विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेत मुंबईचा संघ खेळत आहे. सर्फराझने युवा विश्वचषक स्पध्रेतील सहा सामन्यांमध्ये दोन अर्धशतकांसह २११ धावा केल्या. मुंबईच्या अखेरच्या दोन साखळी लढतींआधी तो संघात सामील होईल. मुंबईचा २ मार्चला सौराष्ट्रशी तर ३ मार्चला महाराष्ट्राशी सामना होणार आहे, अशी माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव नितीन दलाल यांनी दिली. सर्फराझ प्रथमच मुंबईच्या वरिष्ठ संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Story img Loader