अन्वय सावंत, लोकसत्ता
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचे दोन वर्षांनी पुनरागमन, पहिलाच सामना गतविजेत्या सौराष्ट्रविरुद्ध आणि मुंबईची ३ बाद ४४ अशी स्थिती! या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी मुंबईला खमक्या फलंदाजांची आवश्यकता होती. २४ वर्षीय सर्फराज खानने (२७५ धावा) ही जबाबदारी स्वीकारत मुंबईच्या विजयाचा पाया रचला. तसेच सलग दुसऱ्या रणजी हंगामात दमदार कामगिरीसाठी सज्ज असल्याचे सर्फराजने दाखवून दिले. गेल्या काही वर्षांत फलंदाजीत केलेले तांत्रिक बदल आणि मानसिकतेतील सुधारणा हे या यशामागील गमक असल्याचे सर्फराजने नमूद केले.
‘‘माझ्या घरात असलेल्या खेळपट्टीवर मी माझे वडील (नौशाद खान) आणि दोन्ही भाऊ (मोईन आणि मुशीर) यांच्या मदतीने कसून सराव केला. मला कारकीर्दीच्या सुरुवातीला स्विंग होणाऱ्या लाल चेंडूविरुद्ध धावा करणे अवघड जायचे. त्यामुळे गेल्या तीन-चार वर्षांपासून मी माझ्या फलंदाजीत तांत्रिक बदल करण्यावर भर दिला. तसेच माझ्यात संयमाची कमतरता होती. मात्र, खेळपट्टीवर अधिकाधिक वेळ घालवल्याशिवाय धावा करणे शक्य नसल्याचे मला उमगले. मग मी मानसिकतेत सुधारणा केली,’’ असे सर्फराज म्हणाला.
२०१४मध्ये प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सर्फराजला सुरुवातीला धावांसाठी झगडावे लागत होते. परंतु २०१९-२०च्या रणजी हंगामात तो वेगळय़ाच जिद्दीने खेळताना दिसला. प्रथमश्रेणी कारकीर्दीतील पहिल्या ११ सामन्यांत ५३५ धावा करणाऱ्या सर्फराजने या हंगामातील सहा सामन्यांत तब्बल ९२८ धावा फटकावल्या. कामगिरीत सातत्य राखताना त्याने यंदाच्या हंगामात सौराष्ट्रविरुद्ध २७५, गोवाविरुद्ध ६३ आणि ४८, तर ओडिशाविरुद्ध १६५ धावांची खेळी साकारली. ‘‘भारतीय संघात स्थान मिळवायचे असल्यास रणजी करंडकात चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. यंदा माझ्या कामगिरीचा मुंबईला बाद फेरी गाठण्यास फायदा झाला याचे समाधान आहे,’’ असे सर्फराजने सांगितले.