सर्फराझ खानने अलीकडच्या काळात देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी चमकदार कामगिरी केली. त्याचबरोबर भारत ‘अ’ संघाचे प्रतिनिधित्व करतानाही त्याने चांगली फलंदाजी केली होती. त्यानंतर त्याची भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यादरम्यान होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी संघात निवड झाली. आज तिसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी सर्फराझला खेळपट्टीवर येण्याची संधी मिळाली. पहिली धाव काढताच सरफारजची पत्नी रुमाना आपल्या जाग्यावरून उठून आनंदोत्सव साजरा करू लागली. तर सर्फराझचे वडील नौशाद यांनीही टाळ्या वाजवत मुलाच्या पहिल्या धावेचा आनंद व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Ind vs Eng: सर्फराझ, संधी आणि सफर

राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर आज आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तिसऱ्या कसोटीला सुरुवात झाली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. २२ धावसंख्या असताना यशस्वी जयस्वाल केवळ १० धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला शुबमन गिलही शून्यावर बाद झाला. दोघानांही मार्क वूडने माघारी धाडले. ३३ धावसंख्या असताना रजत पटीदारने आपली विकेट गमावली. त्यानंतर आलेल्या रवींद्र जडेजा आणि सलामीवीर रोहित शर्माने भारताचा डाव सांभाळला आणि तब्बल २०४ धावांची भागीदारी रचली.

IND vs ENG : ‘तो संघाच्या विजयात…’, सर्फराझची टीम इंडियात निवड झाल्यावर त्याचे वडील झाले भावूक

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या सर्फराझ खानलाही मार्क वुडने आपल्या तिखट गोलंदाजीने नमवण्याचा प्रयत्न केला. छोटे चेंडू मध्येच पडणाऱ्या यॉर्करला सर्फराझने संयमी वृत्तीने तोंड दिले. कसोटी पदार्पणात पहिल्या तीन धावाकडून सरफारजने कसोटी कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. २६ वर्षीय सरफारजने त्यानंतर जवळपास प्रती चेंडू एक धाव या सरासरीने आपली खेळी केली. केवळ ४८ चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केले.

सरफारजने इंग्लंडच्या फिरकीपटूंवर चांगलाच हल्ला चढविला. जो रुट, टॉम हार्टली आणि रेहन अहमद यांच्या गोलंदाजीला सर्फराझने लक्ष्य केले. ४३ धावसंख्येवर असताना टॉम हार्टलीच्या गोलंदाजीवर पुढे येऊन षटकार ठोकला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर एक धाव घेऊन पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण होताच सर्फराझने आपल्या कुटुंबाच्या दिशेने फ्लाईंग किस केली. त्यानंतर त्याच्या पत्नीनेही सरफारजच्या कृतीला प्रतिसाद दिला.

सर्फराझच्या कुटुंबियांसाठी आजचा दिवस अतिशय भावनिक असा होता. सामना सुरू होण्यापूर्वी जेव्हा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेकडून सर्फराझला टेस्ट कॅप मिळाली तेव्हा सर्फराझचे कुटुंबिय आपले अश्रू रोखू शकले नाहीत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarfaraz khans wifes emotional reaction from stands after he scores first runs is priceless kvg