इंडिया ग्रीन संघाचा सर्फराज खान याने आक्रमक शतक टोलविले, तरीही त्याच्या संघास १९ वर्षांखालील गटाच्या चॅलेंजर क्रिकेट स्पर्धेत इंडिया ब्ल्यू संघाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत इंडिया ब्ल्यू संघाने पाच चेंडू व दोन गडी राखून हा सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना इंडिया ग्रीन संघाने ५० षटकांत ९ बाद २८३ धावा केल्या. त्यामध्ये सर्फराज याने १०३ धावांचा वाटा उचलला. त्याने नऊ चौकार व सहा षटकार अशी आतषबाजी केली व हिम्मतसिंग (३६) याच्या साथीत १०५ धावांची भागीदारी रचली. इंडिया ब्ल्यु संघाने ४९.१ षटकांत व आठ गडय़ांच्या मोबदल्यात २८४ धावा करीत विजय मिळविला. त्याचे श्रेय अमनदीप खरे व अनमोलप्रितसिंग यांनी चौथ्या विकेटसाठी केलेल्या ११६ धावांच्या भागीदारीचा मोठा वाटा होता. खरे याने शैलीदार खेळ करीत ९३ धावा टोलविल्या. अनमोलप्रित याने तडाखेबाज ७५ धावा करीत त्याला चांगली साथ दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा