दोन शानदार विजयानंतर भारताच्या एल. सरिता देवीच्या (६० किलो) वाटय़ाला पराभव आला. चीनमधील क्विनान येथे झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेतील बुधवारचा दिवस भारतासाठी संमिश्र स्वरूपाचा ठरला.
आशियाई कांस्यपदक विजेत्या सरिताने मोंगोलिया आणि कोरियाच्या बॉक्सिंगपटूंविरुद्ध विजय मिळवले. मात्र चीनच्या यिन जुनहुआने तिला ३-० असे हरवले. एक वर्षांच्या बंदीनंतर पुन्हा मैदानावर परतलेल्या सरिताने दमदार कामगिरी केली. राष्ट्रकुलमधील कांस्यपदक विजेत्या पिंकी जांग्राला (५१ किलो) चांग युआनकडून ०-३ असा पराभव वाटय़ाला आला.
आशियाई अजिंक्यपद स्पध्रेत रौप्यपदक कमावणाऱ्या विकास कृष्णनने (७५ किलो) झाओ मिंगानला ३-० असे हरवले. गौरव बिधुरीने (५२ किलो) हु जियांगुनवर विजय मिळवला. विश्वचषक स्पध्रेतील कांस्यपदक विजेता शिवा थापा (५२ किलो) आणि एल. देवेंद्रो सिंग (४९ किलो) यांनीसुद्धा आपल्या लढती गमावल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा