टोक्यो : कोरिया खुल्या स्पर्धेतील विजेतेपदापाठोपाठ आणखी एक विजेतेपद मिळविण्याच्या उद्दिष्टाने सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय जोडी आज, मंगळवारपासून सुरू होणाऱ्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उतरेल. त्याच वेळी यंदाच्या हंगामात सातत्यासाठी झगडणाऱ्या पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय यांचा लय मिळवण्याचा प्रयत्न असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सात्त्विक-चिराग जोडीने दुहेरीतील आपली सातत्यपूर्ण कामगिरी कोरियात कायम राखली. भारतीय जोडीचे हे यंदाच्या हंगामातील चौथे विजेतेपद ठरले. आता हेच सातत्य जपानमध्येही राखायचा त्यांचा प्रयत्न राहील.त्याच वेळी एकेरीत पुरुष विभागात प्रणॉय, लक्ष्य सेन, तर महिला विभागात पी. व्ही. सिंधू हे आपला खेळ उंचावण्यासाठी उत्सुक असतील. सिंधूची पहिल्या फेरीत झ्ँग यी मानशी गाठ पडणार आहे.पुरुष विभागात प्रणॉयसमोर पहिल्याच फेरीत ली शी फेंगचे खडतर आव्हान असेल.