पीटीआय, शेन्झेन
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत रविवारी अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या चीनच्या लिआंग वेई केंग-वँग चँग जोडीने भारतीय जोडीचा २१-१९, १८-२१, २१-१९ असा पराभव केला.
आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या सात्त्विक-चिराग जोडीने चीनच्या जोडीस तब्बल १ तास ११ मिनिटे झुंज दिली. यंदाच्या हंगामात सात्त्विक-चिराग जोडी सहाव्यांदा अंतिम फेरीत खेळली आणि त्यांना प्रथमच पराभव पत्करावा लागला.भारतीय खेळाडूंनी दाखवलेली जिगरबाज वृत्ती विलक्षण होती. लढतीमधील निर्णायक तिसऱ्या गेममध्ये १३-२० अशा पिछाडीवर असताना सात्त्विक-चिराग जोडीने सहा मॅच पॉइंट वाचवत १९-२० अशी रंगत निर्माण केली होती. मात्र, अखेरीस चिनी जोडी विजय मिळवण्यात यशस्वी ठरली. या विजयाने चीनी जोडीने आशियाई क्रीडा स्पर्धेतील सात्त्विक-चिरागकडून झालेल्या पराभवाची परतफेड केली.
हेही वाचा >>>IPL 2024 Retention : मुंबईकडून आर्चरला, कोलकाताचा शार्दुलला निरोप, धोनी पुढचं आयपीएल खेळणार?
अंतिम लढतीत वँगचा खेळ विशेष उठावदार होता. आक्रमक खेळापेक्षा कौशल्यावर ही लढत खेळली गेली. स्मॅशेस मारण्यापेक्षा मोकळय़ा जागा हेरून फटके मारून गुण मिळवण्याकडे दोन्ही जोडय़ांचा अधिक कल होता. प्रतिस्पर्धी जोडय़ांना सातत्याने खेळात आणि वेगात बदल करावा लागत होता. पहिल्या गेममध्ये फटक्यांमध्ये अचूकता नसल्यामुळे आणि सव्र्हिस बरोबर न झाल्यामुळे भारतीय जोडीला सतत पिछाडीवर राहावे लागले. यानंतरही सात्त्विक-चिरागने गेम ९-९, १५-१५, १९-१९ असा बरोबरीत राखला. त्या वेळी लिआंगचा स्मॅस परतवताना सात्त्विकचा फटका नेटमध्ये अडकला आणि भारतीय जोडीला पहिला गेम गमवावा लागला.
भारतीय जोडीने दुसऱ्या गेममध्ये एकत्रित सर्वोत्तम खेळ करत विजय मिळवला आणि लढतीत रंगत निर्माण केली. निर्णायक गेममध्ये सात्त्विक-चिराग जोडीकडून चुका झाल्यामुळे चीनी जोडीला वर्चस्व राखणे शक्य झाले. चिनी जोडीने या गेममध्ये ८-१ आणि ११-६ अशी आघाडी भक्कम केली. त्यानंतर सात मॅच पॉइंट मिळवले. या कठीण परिस्थितीत भारतीय जोडीने सहा मॅच पॉइंट वाचविण्याची जिद्द दाखवली. पण, एका प्रदीर्घ रॅलीनंतर भारतीय जोडीचा बचाव अपुरा पडला.