Satwik Chirag pair beat Allen Ryan pair to win BWF 500 tournament Korea Open title: सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या भारतीय पुरुष जोडीने बीडब्ल्यूएफ ५०० टूर्नामेंट कोरिया ओपनचे विजेतेपद पटकावले. त्यांनी इंडोनेशियाच्या फजर अॅलन आणि मोहम्मद रियान या जगातील नंबर वन जोडीचा पराभव केला. हा सामना ६२ मिनिटे चालला, ज्यात १७-२१, २१-१३, २१-१४ असा भारतीय पुरुष जोडीने विजय मिळवला. या सामन्यापूर्वी इंडोनेशियन जोडीविरुद्धचा विक्रम २-२ असा बरोबरीत होता.

सात्विक-चिराग जोडीने सलग दुसरे विजेतेपद पटकावले –

सात्विक आणि चिराग यांनी यावर्षी इंडोनेशिया सुपर १००० आणि स्विस ओपन सुपर ५०० विजेतेपद पटकावले आहेत. जूनमध्ये इंडोनेशिया ओपन ही शेवटची स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय जोडीचे हे सलग दुसरे विजेतेपद आहे. त्याच वेळी, हे त्यांचे तिसरे बीडबल्यएफ ५०० विजेतेपद आहे. यापूर्वी त्यांनी २०१९ मध्ये थायलंड ओपन आणि गेल्या वर्षी इंडिया ओपन जिंकली होती.

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Loksatta Lokankika Five ekankika  in Mumbai zonal finals Mumbai news
मुंबई विभागीय अंतिम फेरीत पाच एकांकिकांची धडक
Kalidas hirve , Vasai National Marathon Competition,
वसईत रंगली राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा, साताऱ्याचा कालिदास हिरवे विजेता
aamir khan got award red sea films
आमिर खानने अनेक वर्षानंतर लावली अवॉर्ड शोला हजेरी, मिळाला ‘हा’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार
India Beat Sri Lanka by 7 Wickets in Semifinal and Enters Final of U19 Asia Cup
IND U19 vs SL U19: भारताचा U19 संघ आशिया चषकाच्या अंतिम फेरीत, १३ वर्षीय वैभव सूर्यवंशीने २४ चेंडूत केलं अर्धशतक; अंतिम फेरीत कोणाविरूद्ध खेळणार?
world chess championship 9th game between d gukesh and ding liren ends in draw
डाव नवा, निकाल तोच! गुकेशच्या प्रयत्नांना अपयशच; सलग सहावी बरोबरी

सात्विक आणि चिराग यांनी त्यांची जोडी बनल्यापासून अनेक विजेतेपदे जिंकली आहेत. ज्यात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक, थॉमस चषक सुवर्णपदक, जागतिक स्पर्धेत कांस्य पदक तसेच सुपर ३०० (सय्यद मोदी आणि स्विस ओपन), सुपर ५०० (थायलंड आणि इंडिया ओपन), सुपर ७५० (फ्रेंच ओपन) आणि इंडोनेशिया ओपन सुपर १००० यांचा समावेश आहे.

हेही वाचा – विश्वचषकाच्या प्रोमो VIDEO मधून बाबर आझमला वगळल्याने शोएब अख्तर संतापला; आयसीसीवर टीका करताना म्हणाला…

जागतिक क्रमवारीतील तिसऱ्या क्रमांकाच्या जोडीवर उपांत्य फेरीत केली होती मात –

तत्पूर्वी, सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने शनिवारी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या, लियांग वेई केंग आणि वांग चांग यांच्यावर मात केली होती. त्याचबरोबर या रोमहर्षक सरळ गेममधील विजयानंतर अंतिम फेरीत प्रवेश केला होता. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जोडीवर भारतीय जोडीने जिनम स्टेडियमवर ४० मिनिटांच्या लढतीत चीनच्या जोडीवर २१-१५, २४-२२ असा विजय नोंदवला होता.

Story img Loader