भारताच्या सात्विकराज रणकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुहेरी प्रकाराच बाजी मारली आहे. जगज्जेत्या ली जुन ह्युई आणि यू चेन या चिनी जोडीला भारतीय जोडीने पराभवाचं पाणी पाजलं. Super 500 प्रकारातली स्पर्धा जिंकणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली आहे. भारतीय जोडीने चिनी जोडीचं आव्हान २१-१९, १८-२१, २१-१८ असं परतवून लावलं. भारतीय जोडीचं हे पहिलं दुहेरी विजेतेपद ठरलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जागतिक क्रमवारीत सोळाव्या स्थानावर असलेल्या भारतीय जोडीने पहिल्या सेटची धडाक्यात सुरुवात केली. पहिल्या काही मिनीटांमध्ये भारतीय जोडीने ७-३ अशी आघाडी घेतली. मात्र चिनी जोडीने आपला अनुभव पणाला लावत आपला खेळ सुधारला. मध्यांतरानंतर चिनी जोडीने भारतीय जोडीशी १५-१५ अशी बरोबरी केली. मात्र सात्विकराज आणि चिराग शेट्टीने संपूर्ण जोर लावत पहिला सेट जिंकला.

दुसऱ्या सेटमध्येही भारतीय जोडीने चांगली सुरुवात केली होती. सुरुवातीच्या मिनीटांमध्ये भारतीय जोडीने ६-३ अशी आघाडी घेतली. मात्र मध्यांतरानंतर चिनी जोडीने सामना फिरवला, भारतीय जोडीला मागे ढकलत चिनी खेळाडूंनी आघाडी घेतली. लागोपाठ ४ गुण मिळवत चिनी खेळाडूंनी दुसरा सेट १८-२१ ने खिशात घातला. तिसऱ्या सेटमध्ये सुरुवातीला भारतीय जोडी ३-६ ने पिछाडीवर पडली होती. मात्र दोन्ही खेळाडूंनी स्वतःला वेळेतच सावरत ८-६ ने आघाडी घेतली. यानंतर भारतीय जोडीने चिनी खेळाडूंना सामन्यात पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. तासाभराच्या खेळात भारतीय जोडीने अंतिम सामना जिंकत विजेतेपदावर आपली मोहर उमटवली.