सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने आज रविवारी बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. अशी सुवर्ण कामगिरी करणारी चिराग-सात्विकची जोडी भारतातील पहिली ठरली आहे. गतवर्षीही या जोडीने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. दुबईत खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात ओंग यू सिन आणि टियो ई या मलेशियाच्या जोडीचा ६७ मिनिटांत १६-२१,२१-१७,२१-१९ ने पराभव केला. १९७१ ला दिपू घोष आणि रमन घोष यांनी या स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं होतं.
सात्विक-चिरागची ‘सुवर्ण’ कामगिरी; आशिया चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय जोडी
सात्विक-चिराग जोडीने आशिया चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलं.
Written by स्पोर्ट्स न्यूज डेस्क
First published on: 30-04-2023 at 21:13 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satwiksairaj rankireddy chirag shetty win gold in badminton asia championships badminton sports latest news update nss