Pakistan vs Sri Lanka: पाकिस्तानचा डावखुरा फलंदाज सौद शकीलने श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ५७ धावांची खेळी करत विश्वविक्रम केला आहे. खरे तर सौद शकील सलग ७ कसोटी सामन्यात अर्धशतक ठोकणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ५०व्या कसोटीत इतिहास रचला आहे. सौदने कोलंबो कसोटीच्या पहिल्या डावात ५७ धावा करत हा विक्रम केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुनील गावसकरांसह ‘या’ खेळाडूंना मागे सोडले

या पाकिस्तानी फलंदाजाने इतिहास रचताना भारताचा सुनील गावसकर, गयानाचा बेसिल बुचर आणि पाकिस्तानचा सईद अहमद यांना मागे टाकले आहे. या सर्वांनी त्यांच्या कारकिर्दीतील पहिल्या ६ सामन्यांमध्ये ५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या होत्या. कसोटी क्रिकेटच्या १४६ वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आली नव्हती, पण सौदने ते करून दाखवले.

यापूर्वी भारताचे सुनील गावसकर, पाकिस्तानचे सईद अहमद, वेस्ट इंडिजचे बॅसिल बुचर आणि न्यूझीलंडचे बर्ट सटक्लिफ यांनी आपल्या कारकिर्दीतील पहिल्या सहा कसोटी सामन्यांमध्ये प्रत्येकी अर्धशतके झळकावली होती. शकीलचे आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीतील स्कोअर ३७, ७६, ६३, ९४, २३, ५३, २२, ५५*, १२५*, ३२, २०८*, ३० आणि ५७.

शकीलने शफीकसोबत शतकी भागीदारी केली

कोलंबो कसोटीत शकीलने पुन्हा एकदा ५७ धावांची खेळी करत संघाला संकटातून बाहेर काढले. तो जेव्हा खेळपट्टीवर फलंदाजीला आला तेव्हा पाकिस्तानची धावसंख्या २१०/३ होती. सौद आणि शफीक यांनी चौथ्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी केली. या भागीदारीने पाकिस्तानला मजबूत स्थितीत आणले. सौद शकील बाद झाला तेव्हा पाकिस्तानची धावसंख्या ३१९/४ झाली होती आणि एकूण आघाडी १५०च्या पुढे गेली होती.

शकीलने इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले

डिसेंबर २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या सौद शकीलने सलग ७ कसोटीत अर्धशतके झळकावली आहेत. पदार्पणातच त्याने पहिल्या डावात ३७ धावा आणि दुसऱ्या डावात ७६ धावा केल्या. यानंतर दुसऱ्या कसोटीत त्याने ६३ आणि ९४ धावांची खेळी खेळली. तिसऱ्या कसोटीत ५३ आणि चौथ्या कसोटीत ५५ धावा केल्या. शकीलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत झळकावले. आपल्या सहाव्या कसोटीत शकीलने श्रीलंकेविरुद्ध द्विशतक झळकावले.

हेही वाचा: Pakistan Cricket Board: कुठे ते बीसीसीआय अन कुठे ते पीसीबी! मानधनावरून नवा गोंधळ, खेळाडूंचा स्वाक्षरी करण्यास नकार

दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात ४८.४ षटकात १६६ धावांवर आटोपला. संघाकडून सर्वाधिक धावा धनंजय डी सिल्वाच्या बॅटमधून आल्या. ६८ चेंडूंचा सामना करत त्याने ९ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५७ धावांची अर्धशतकी खेळी केली. पाकिस्तानकडून फिरकीपटू अबरार अहमदने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. पाकिस्तानने पहिल्या डावात ४०० धावांचा टप्पा ओलांडला आहे.

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन: अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, शान मसूद, बाबर आझम (कर्णधार), सौद शकील, सर्फराज अहमद (यष्टीरक्षक), आगा सलमान, नोमान अली, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद.

हेही वाचा: Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरच्या कृतीवर पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी संतापला; म्हणाला, “हे जरा अतीच झालं…”

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन: निशान मदुष्का, दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल, धनंजय डी सिल्वा, सदीरा समरविक्रमा (यष्टीरक्षक), रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saud shakeel made a world record by playing just 7 tests many veterans including sunil gavaskar were left behind avw