Saud Shakeel selected in main squad for Asia Cup 2023: आशिया चषक २०२३ पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा ३० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा सहा संघांमध्ये रंगणार आहे. आशिया कप सुरू होण्यापूर्वी पाकिस्तान संघाने आपल्या संघात मोठा बदल केला आहे. आता एका राखीव खेळाडूला मुख्य संघात संधी मिळाली आहे. या खेळाडूला आधी या स्पर्धेसाठी राखीव म्हणून घेतले होते. मात्र आता बोर्डाने अचानक निर्णय बदलून त्या खेळाडूला मुख्य संघात संधी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या खेळाडूला संधी मिळाली –

पाकिस्तानने त्यांच्या आशिया कप २०२३ संघात एका अतिरिक्त खेळाडूचा समावेश केला आहे. मधल्या फळीतील फलंदाज सौद शकीलचा पाकिस्तानच्या आशिया कप संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर तय्यब ताहिरला राखीव म्हणून ठेवण्यात आले आहे. शकील सुरुवातीच्या १७ सदस्यीय संघाचा भाग नव्हता आणि अफगाणिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेसाठी तो संघातील १८ वा सदस्य होता. सुरुवातीला संघात असलेला ताहिर अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत एकही सामना खेळला नाही. आशिया चषकादरम्यान तो राखीव खेळाडू म्हणून संघासोबत असणार आहे.

हेही वाचा – World Cup 2023: कपिल देव यांचा विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला महत्त्वाचा इशारा; म्हणाले, “जर दुखापतग्रस्त खेळाडूंना…”

अफगाणिस्तान मालिकेसाठी एकदिवसीय संघात पुनरागमन केलेल्या शकीलने फक्त एक सामना खेळला आणि 9 धावा केल्या. आशिया चषकात पाकिस्तानचा पहिला सामना ३० ऑगस्ट रोजी मुलतानमध्ये नेपाळविरुद्ध होणार आहे. सोमवारी संध्याकाळी बाबर आझम, इमाम-उल-हक आणि नसीम शाह यांच्यासोबत संघ २७ ऑगस्टला मुलतानला पोहोचेल. याशिवाय आशिया चषकात पाकिस्तानचा सर्वात मोठा सामना भारताविरुद्ध २ सप्टेंबर रोजी होणार आहे.

आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ: बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, शादाब खान, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी आणि सौद शकील.

राखीव खेळाडू: तय्यब ताहिर.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saud shakeel replaces tayyab tahir in pakistans main squad for asia cup 2023 vbm