जगातील सर्वात मोठी टी-२० क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धा. या लीगचा १५वा हंगाम यावर्षी होणार आहे. दोन नव्या संघांच्या समावेशामुळे मेगा ऑक्शन बंगळुरूमध्ये पार पडले. यात अनेक नव्या आणि युवा खेळाडूंचे नशीब उघडले. वर्धा शहरालगत असलेल्या म्हसाळा येथील सौरभ दुबे (२५) याची आयपीएलमध्ये निवड झाली आहे.सनरायझर्स हैदराबाद संघाने सौरभला २० लाख रुपयांची बोली लावत संघात घेतले आहे. या कामगिरीमुळे सौरभने वर्धाचे नाव रोशन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सौरभने अत्यंत कठीण परिस्थितीत क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. गेली पाच वर्षे तो विदर्भ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चालणाऱ्या स्पर्धांमध्ये आपली चुणूक दाखवत आहे. १३ फेब्रुवारी रोजी झालेल्या लिलावात सनरायझर्स हैदराबाद संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दाखवला. याआधी तो मुंबई इंडियन्स संघात नेट बॉलर होता. आता त्याला येणाऱ्या हंगामात मुंबईविरुद्ध खेळण्याची संधी मिळू शकते.

सौरभच्या निवडीची बातमी पसरताच जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींनी आनंद व्यक्त केला. वर्धासारख्या छोट्या शहरातील खेळाडूची आयपीएलसारख्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाल्याने सौरभचे विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे.

हेही वाचा – RANJI : विश्वविजेत्या कॅप्टनचं पदार्पणात ‘यश’..! थेट सचिन, रोहितच्या यादीत मिळवलं स्थान; पाहा VIDEO

आयपीएल २०२२च्या लिलावात सनरायझर्स हैदराबाद संघाने आतापर्यंत २० खेळाडूंना खरेदी केले आहे. संघाने सर्वाधिक १०.७५ कोटी रुपये वेस्ट इंडीजच्या निकोलस पूरनवर खर्च केले. यापूर्वी संघाने कर्णधार केन विल्यमसनसह तीन खेळाडूंना कायम ठेवले होते. म्हणजेच संघात एकूण २३ खेळाडू आहेत.

सनरायझर्स हैदराबाद संघ

वॉशिंग्टन सुंदर, निकोलस पूरन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, प्रियम गर्ग, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, विष्णू विनोद, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल, जगदीश सुचित, एडन मार्कराम, मार्को यान्सन, रोमेरिया शेफर्ड, आरसेन शेफर्ड, आर. शशांक सिंग, फजलहक फारुकी, सौरभ दुबे.