नवी दिल्ली : देशांतर्गत क्रिकेटमध्ये पूर्वी मुंबईविरुद्ध खेळताना सौराष्ट्रच्या खेळाडूंमध्ये भीती असायची. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. मुंबईसह अन्य संघ आता आम्हाला घाबरतात, असे वक्तव्य सौराष्ट्र क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक नीरज ओडेड्रा यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सौराष्ट्रच्या संघाने गेल्या काही वर्षांमध्ये जयदेव उनाडकटच्या नेतृत्वाखाली झपाटय़ाने प्रगती केली आहे. यंदा त्यांनी गेल्या तीन हंगामांत दुसऱ्यांदा रणजी करंडकावर आपले नाव कोरले. सौराष्ट्रने दोन्ही वेळा अंतिम सामन्यांत बंगालला पराभूत करत जेतेपद पटकावले. तसेच सौराष्ट्रने यंदा विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धाही जिंकली. ‘‘तीन वर्षांत दोन रणजी जेतेपदे आणि विजय हजारे करंडक, ही आमची कामगिरी खूप बोलकी आहे. आम्ही लाल चेंडूंने होणाऱ्या स्पर्धामध्ये यापूर्वीही चांगली कामगिरी केली होती. परंतु यंदा विजय हजारे करंडक पटकावल्याने सौराष्ट्रचा संघ क्रिकेटच्या सर्व प्रकारांत दमदार कामगिरी करू शकतो हे सिद्ध झाले. १० वर्षांपूर्वी सौराष्ट्रचे खेळाडू मुंबईविरुद्ध खेळताना घाबरायचे. मात्र, आता मुंबई आणि अन्य संघ आम्हाला घाबरतात. हा बदल आमच्यासाठी खूप मोठा आहे,’’ असे ओडेड्रा म्हणाले.