आशियाचा अव्वल खेळाडू आणि आशियाई क्रीडा स्पध्रेचे अग्रमानांकन लाभलेल्या सौरव घोषाल याला २-० अशा महत्त्वपूर्ण आघाडीनंतर जेतेपदाने हुलकावणी दिली. अब्दुल्ला अल मुझाईनविरुद्धच्या लढतीत विजयाच्या दारावरून निराशाजनक पराभव पत्करल्यामुळे सौरवला पुरुष एकेरीच्या रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
जागतिक क्रमवारीत १६व्या स्थानावर असलेल्या सौरवने कुवेतच्या अब्दुल्लाविरुद्ध प्रारंभी १२-१०, ११-२ अशी आघाडी घेतली होती. परंतु अब्दुल्लाने नंतर सौरवचे दडपण झुगारून देत त्याच्या सोनेरी स्वप्नाचे रुपेरीकरण केले. अब्दुल्ला जागतिक क्रमवारीत ४६व्या स्थानावर असला तरी सध्याचा उदयोन्मुख तारा मानला जातो. त्याने त्यानंतरचे तीन गेम १४-१२, ११-८, ११-९ अशा फरकाने जिंकले आणि भारताची स्क्वॉशमधील सुवर्णपदकाची संधी मावळली. परंतु या खेळातील पहिले रौप्यपदक जिंकत सौरवने इतिहास घडवला. अब्दुल्लाने उत्तरार्धात दिमाखदार खेळाचे प्रदर्शन केले आणि ८८ मिनिटांत हा सामना जिंकला.
दरम्यान, रौप्यपदक विजेता खेळाडू सौरव घोषालच्या अनुपस्थितीत भारताने आशियाई क्रीडा स्पध्रेतील सांघिक विभागातील ‘ब’ गटाच्या लढतीत जॉर्डनवर २-१ अशी मात केली. कुश कुमार आणि अनुभवी हरिंदर पाल संधू यांनी आपले सामने जिंकले, तर शर्थीच्या झुंजीनंतर महेश माणगावकरने हार पत्करली. एकेरीतील सुवर्णपदक गमावल्यामुळे निराश झालेला घोषाल या सामन्यात खेळू शकला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

०-२ अशा पिछाडीनंतर अब्दुल्लाने सामन्यात शानदार पुनरागमन केले. त्याने काही लाजवाब फटके खेळले. त्याने सामन्यात परतण्यासाठी अतिशय खास कामगिरी केली. माझ्यासाठी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मी हा सामना जिंकू शकलो नाही. मी सुवर्णपदक जिंकण्यासाठी आलो होतो, परंतु रौप्यपदक जिंकले आणि त्यामुळे माझी निराशा झाली आहे. त्याच्या चिवट आणि झुंजार खेळाला विजयाचे श्रेय द्यायला हवे.
-सौरव घोषाल

आशियाई क्रीडा स्पध्रेच्या चौथ्या दिवशी पाच पदकांची भर घालत भारताने गुणतालिकेतील आपले १३वे स्थान कायम राखले आहे.
भारताचा आघाडीचा नेमबाज अभिनव बिंद्राने आशियाई पदकांचा दुष्काळ संपवताना वैयक्तिक आणि सांघिक अशी दोन कांस्यपदके पटकावली.
याचप्रमाणे सौरव घोषालने स्क्वॉशमध्ये ऐतिहासिक रौप्यपदक जिंकण्याची किमया साधली.
तसेच युमनाम संथोई देवी आणि नरेंदर ग्रेवाल यांनी वुशूमध्ये कांस्यपदके पटकावली.