कामगिरीच्या आधारे बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंत हिची आगामी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या प्रशिक्षणासाठी निवडण्यात येणाऱ्या मुख्य संघात समावेश केली जाण्याची शक्यता भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने शुक्रवारी उच्च न्यायालयात वर्तवली.
बॅडमिंटनच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक गोपीचंद आपल्याला सापत्न वागणूक देत असल्यानेच आपली मुख्य संघात निवड होऊ शकत नसल्याचा आरोप प्राजक्ताने केला होता. तसेच त्याविरोधात तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठीच्या मुख्य संघात तिची निवड का केली जात नाही आणि ही निवड नेमक्या कशा पद्धतीने केली जाते, याची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने भारतीय क्रीडा प्राधिकरणाला (साई) दोन आठवडय़ापूर्वी दिले होते. मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती मनोज संकलेचा यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली.

Story img Loader