सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिल्लीच्या ऋषभ पंतने सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रविवारी नवी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या सामन्यात पंतने वादळी खेळी केली. ऋषभने ३२ चेंडुंमध्ये शतक झळकावत भारताच्या रोहित शर्माचा विक्रम मागे टाकला. रोहितने २०१७ साली इंदूर येथे झालेल्या टी-२० सामन्यात श्रीलंकेविरुद्ध ३५ चेंडुंमध्ये शतक झळकावलं होतं.

विजयासाठी आवश्यक असलेल्या १४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने डावाची आक्रमक सुरुवात केली. यात ऋषभ पंतच्या शतकाने दिल्लीचा विजय अधिक सोपा करुन दिला. पंतने ३८ चेंडुंमध्ये ११६ धावा काढल्या. या शतकी खेळीमध्ये ८ चौकार आणि १२ षटकारांचा समावेश होता. ऋषभच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने हिमाचल प्रदेशवर १० गडी राखून मात केली.

टी-२० सामन्यात भारताकडून सर्वात जलद शतक झळकावणारे फलंदाज –

१) ऋषभ पंत ३२ चेंडूत शतक – दिल्ली विरुद्ध हिमाचल प्रदेश

२) रोहित शर्मा – ३५ चेंडूत शतक – भारत विरुद्ध श्रीलंका

३) युसूफ पठाण – ३७ चेंडूत शतक – राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स</p>