चेन्नईत रविवारी होणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण सभेला एन. श्रीनिवासन हजर राहू शकतील का, हे शुक्रवारी दुपारी होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर अवलंबून आहे.
बीसीसीआयच्या २९ सप्टेंबरला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना उपस्थित राहण्यास मनाई करावी, अशा आशयाच्या बिहार क्रिकेट संघटनेचे सचिव आदित्य वर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. शुक्रवारी जर सर्वोच्च न्यायालयाने बिहार क्रिकेट असोसिएशनच्या बाजूने निर्णय दिला तरी श्रीनिवासन यांच्याकडे सत्तचे नवे सूत्र तयार आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची त्यांची दोन वष्रे या महिन्यात संपत आहेत, परंतु ते आणखी एक वर्ष आपला कार्यकाल वाढवू शकतात.

Story img Loader