Asia Cup 2023 Schedule has been announced: आशिया चषक २०२३ ही स्पर्धा श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये संयुक्तपणे आयोजित केला जाणार आहे. आशिया चषक २०२३ चे आयोजन बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी पाकिस्तान दौरा करण्यास नकार दिला होता. त्यानंतर पीसीबीचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांच्या नेतृत्वाखाली हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. ज्याला सर्व देशांच्या बोर्डांनी मान्यता दिली होती. भारताचे सामने संपूर्णपणे श्रीलंकेत खेळवले जातील. त्याचबरोबर, भारत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला, तरच अंतिम सामना श्रीलंकेत खेळवला जाईल.
आशिया कप २०२३ च्या वेळापत्रकाची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांनी १९ जुलै रोजी आगामी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सप्टेंबरला सामना होणार आहे. तर आशिया कप २०२३ चा अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी होणार आहे.
आशिया कप २०२३ स्पर्धेतील सहभागी संघ –
आशिया चषक २०२३ भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. नेपाळ, पाकिस्तान आणि भारत हे गट-अ मध्ये आहेत. तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे गट-ब मध्ये आहेत. आशिया चषक २०२३ यावर्षी ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल.
आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी आशिया चषक २०२३ हे संघांसाठी एक मोठे व्यासपीठ असेल. गट-अ आणि गट-ब मधील टॉप-2 संघ सुपर-4 टप्प्यात पोहोचतील. सुपर-4 टप्प्यात एकमेकांशी खेळल्यानंतर, टॉप-2 संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचतील.
आशिया चषक २०२३ स्पर्धेतील भारताचे वेळापत्रक –
आशिया चषक २०२३ गटातील टीम इंडियाचा पहिला सामना २ सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कँडी येथे पाकिस्तान विरुद्ध खेळला जाईल. दुसरा सामना ४ सप्टेंबर रोजी नेपाळ विरुद्ध श्रीलंकेतील कँडी येथे होणार आहे.
आशिया कप २०२३ चे वेळापत्रक (फेरी नंबर -१)
३० ऑगस्ट – पाकिस्तान विरुद्ध नेपाळ, मुलतान
३१ ऑगस्ट – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका, कॅंडी
२ सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, कॅंडी
३ सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, लाहोर
४ सप्टेंबर – भारत विरुद्ध नेपाळ, कॅंडी
५ सप्टेंबर – नेपाळ विरुद्ध अफगाणिस्तान
सुपर-4 (फेरी नंबर -२)
६ सप्टेंबर – A1 विरुद्ध B2, लाहोर
९ सप्टेंबर – B1 विरुद्ध B2, कँडी
१० सप्टेंबर – AI विरुद्ध A2, कँडी
१२ सप्टेंबर – A2 विरुद्ध B1, डंबुला
१४ सप्टेंबर – A1 विरुद्ध B1, डंबुला
१५ सप्टेंबर – A2 विरुद्ध B2, डंबुला
१७ सप्टेंबर – अंतिम सामना