फॉम्र्युला-वन मोटार शर्यतीमधील महान खेळाडू असलेल्या मायकेल शूमाकर याच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणा झाली आहे. मात्र त्याच्या जिवाचा धोका अद्याप टळलेला नाही.
शूमाकरला आल्प्स पर्वतात स्कीइंग करताना अपघात झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला ग्रेनोबेल येथील रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे मात्र अद्यापही त्याच्या प्रकृतीला धोका असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख जीन फ्रान्कोइस पायेन यांनी याबाबत सांगितले की, ‘‘शूमाकरच्या प्रकृतीत सुधारणा दिसत असली तरी त्याच्या भवितव्याविषयी आम्ही काहीही सांगू शकत नाही. त्याच्यावर सोमवारी रात्री दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, मात्र त्याची स्थिती चिंताजनक आहे. २४ तास अनेक वैद्यकीय तज्ज्ञांमार्फत त्याच्यावर देखरेख केली जात आहे. तो फक्त ४५ वर्षांचा असल्यामुळे विविध उपचारांना त्याच्या शरीराकडून सकारात्मक सहकार्य मिळत आहे. त्याच्या प्रकृतीबाबत कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही.’’
शूमाकर याला झालेल्या अपघाताची चौकशी करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, ‘‘या अपघातात शूमाकर याच्या हेल्मेटचे दोन तुकडे झाले. हे तुकडे रक्ताने माखले होते.’’
शूमाकरचे नातेवाईक व अनेक चाहत्यांनी येथील रुग्णालयाच्या परिसरात गर्दी केली आहे. त्याच्यावर उपचाराबाबत त्याचे नातेवाइकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान त्याला झालेल्या अपघातामुळे मोटार शर्यतीच्या क्षेत्रातील अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे. जर्मनीचे राजदूत अँजेला मेर्केल यांनी या अपघातातबाबत मला खूप दु:ख झाल्याचे सांगितले आहे. शूमाकर हा लवकरच पूर्णपणे बरा होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. फॉम्र्युला-वन शर्यतपटू सेबॅस्टियन व्हेटेलने शूमाकर हा लवकरच तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा