Who is Charlie Cassell: सोमवारी स्कॉटलंड आणि ओमान यांच्यात झालेल्या सामन्यात एक विश्वविक्रम पाहायला मिळाली. डंडी, स्कॉटलंड येथे खेळल्या गेलेल्या ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग-२ सामन्यात चार्ली कॅसलने आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला आणि पदार्पणाच्या सामन्यातच उत्कृष्ट कामगिरी करत विश्वविक्रम केला. वेगवान गोलंदाज चार्ली कॅसलने (Charlie Cassell) पदार्पणात ७ विकेट घेतल्या.

हेही वाचा – Olympics 2024: ऑलिम्पिकच्या लोगोमध्ये पाच वर्तुळ का असतात? काय आहे याचा अर्थ; जाणून घ्या

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Mike Tyson, YouTube Influencer, Netflix, Mike Tyson news, Mike Tyson latest news,
विश्लेषण : माजी जगज्जेता माइक टायसन यू-ट्यूब इन्फ्लुएन्सरकरडून पराभूत! लढत खरी होती की लुटुपुटूची? फायदा नेटफ्लिक्सचाच?
Shubman Gill injury update ahead Border Gavaskar Trophy
Shubman Gill : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीतून शुबमन गिल बाहेर? पहिल्या सामन्यापूर्वीच भारताची वाढली डोकेदुखी
KL Rahul Injured in Intra Squad Match Simulation Session Perth Walks Off Field for Scanning Ahead Border Gavaskar Trophy IND vs AUS
IND vs AUS: भारताला पर्थ कसोटीपूर्वी मोठा धक्का, केएल राहुलला सराव सामन्यात दुखापत, सोडावं लागलं मैदान!
anshul kamboj
१० पैकी १० विकेट्स! अंशुल कंबोजचा रणजी स्पर्धेत विक्रम
Border Gavaskar Trophy IND vs AUS Memorable Innings in Marathi
Border Gavaskar Trophy Best Innings: सचिन, द्रविड, पंत अन् बुमराहचा स्लोअर बॉल…, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासातील संस्मरणीय क्षण

चार्ली कॅसल पदार्पणात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने ५.४ षटकांत २१ धावा देत ७ विकेट घेतले. यादरम्यान त्याने एक मेडन षटकही टाकले. त्याने १२व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर झीशान मकसूदला पायचीत केले. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर त्याने अयान खानला क्लीन बोल्ड केले. त्याची हॅटट्रिक हुकली असली तरी त्याने भेदक गोलंदाजी करत चौथ्या चेंडूवर खालिद कैलला बाद करून सलग विकेट्स घेतल्या.

कॅसलने १४व्या, १८व्या, २०व्या आणि २२व्या षटकात विकेट घेत ओमान संघाला बॅकफूटवर आणले. चार्ली कॅसलच्या शानदार गोलंदाजीसमोर ओमानचा संघ अवघ्या २१.४ षटकांत ९१ धावा करून सर्वबाद झाला. त्याचा पाठलाग करताना स्कॉटलंडने अवघ्या १७.२ षटकांत ८ विकेट्स राखून सामना जिंकला. चार्ली कॅसल पदार्पणातच ७ विकेट्स घेऊन सर्वोत्तम गोलंदाजी करणारा जगातील अव्वल गोलंदाज बनला आहे.

हेही वाचा – IND vs SL: टी-२० मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर, नव्या कर्णधाराची केली घोषणा; अनुभवी खेळाडूला डच्चू

Charlie Cassell: पदार्पणाच्या सामन्यात ७ विकेट घेत रचला इतिहास

चार्ली कॅसलचा जन्म ॲबरडीन येथे झाला. २०२४च्या हंगामासाठी यूकेच्या फॉरफारशायर क्रिकेट क्लबने त्याला करारबद्ध केले. सध्या सिडनी येथे राहणारा चार्ली २०२२ मध्ये ईस्टर्न प्रीमियर लीगमध्ये फॉकलंड सीसीकडून खेळला. एका मोसमात त्याचा USA आणि UAE विरुद्ध स्कॉटलंड अ संघात समावेश करण्यात आला होता. ज्यामध्ये स्कॉटलंडकडून खेळताना त्याने ६८२ धावा केल्या आणि ४४ विकेट घेतल्या. चार्ली हा क्रिकेट NSW प्रीमियर लीगमध्ये सिडनी युनिव्हर्सिटी सीसीचा खेळाडू आहे.

हेही वाचा – IND vs SL: भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले आहेत तरी कोण? देशांतर्गत क्रिकेटमधील आकडे वाचून व्हाल चकित

चार्ली कॅसल हा केवळ गोलंदाजच नाही तर तो एक चांगला फलंदाजही आहे. चार्लीला ज्या प्रकारे पदार्पणाची संधी मिळाली जी त्याच्या नशीबाने दिलेली एक मोठी होती. ७ दिवसांपूर्वीच १५ जुलै रोजी ओमानविरुद्धच्या सामन्यासाठी कॅसलचा स्कॉटलंड संघात समावेश करण्यात आला होता. वेगवान गोलंदाज ख्रिस सोलच्या जागी त्याचा समावेश करण्यात आला. सोलने वैयक्तिक कारणांमुळे या मालिकेतून माघार घेतली, परंतु कदाचित कॅसल किंवा कर्णधार रिची बेरिंग्टनला माहित नव्हते की तो पदार्पणातच हा पराक्रम करेल.

हेही वाचा – ICC T20 क्रमवारीत भारताच्या लेकींची कमाल, हरमनप्रीत कौर आणि शेफाली वर्माची मोठी झेप

चार्ली कॅसलने तोडला रबाडाचा विक्रम

चार्ली कॅसलने दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज कागिसो रबाडाचा मोठा विक्रम मोडला आहे. रबाडाने ९ वर्षांपूर्वी १० जुलै २०१५ रोजी मीरपूरमध्ये बांगलादेशविरुद्ध सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम केला होता. रबाडाने ८ षटकांत फक्त १६ धावा देत ६ विकेट घेतले. वेस्ट इंडिजचा गोलंदाज फिडेल एडवर्ड्सनेही पदार्पणात ६ विकेट घेतल्या आहेत.