वर्णद्वेषी ‘ट्विट’मुळे स्कॉटलंडचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज माजिद हकला मायदेशी पाठवण्यात आले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत त्याला संघातून वगळण्यात आले होत़े  त्यानंतर त्याने ‘ट्विटर’वर वर्णद्वेषी टिप्पणी केली़  
‘‘अल्पसंख्याक असणे हे नेहमी जिकिरीचे असते,’’ असे ‘ट्विट’ त्याने केल्यामुळे स्कॉटलंड संघाच्या नियमांचे उल्लंघन झाले आणि त्यांनी त्याला मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला़  
या संदर्भात स्कॉटलंड क्रिकेट मंडळाने सांगितले की, ‘‘आमच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हक याला मायदेशी पाठविण्यात येत आहे.’’

Story img Loader