न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये २०१५ साली होणाऱया क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत स्कॉटलँड आणि अरब अमराती (यूएई) संघांचाही समावेश असणार आहे. विश्वचषकात समाविष्ट होण्यासाठीच्या पात्रता फेरीत स्कॉटलँड क्रिकेट संघाने केनियावर मात करत विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळविला, तर ‘यूएई’ संघाने नांबियाला पराभूत करत विश्वचषकाचे तिकीट मिळविले आहे.   
केनिया संघाने प्रथम फलंदाजी करत स्कॉटलँड संघासमोर २६० धावांचे आव्हान ठेवले होते. हे लक्ष्य स्कॉटलँड संघाकडून कर्णधार प्रेस्टन मॉमसेनने ७८ धावा ठोकल्या त्याला उत्तम साथ देत मॅटी क्रॉसने ५५ धावांची खेळी साकारली. सामना केनियाच्या बाजूने झुकला असताना स्कॉटलँडच्या रॉब टेलरेने ३७ चेंडूत ४६ धावांची फटेकबाजी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.
दुसऱया बाजूला यूएई संघाने नांबिया संघावर ३६ धावांची मात केली. विश्वचषकात खेळण्याचे स्थान मिळाले यावर काही मी शब्दात काहीच सांगू शकत नाही इतका आनंद झाला आहे. असे यूएईच्या कर्णधाराने व्यक्त केले. १९९६ नंतर पहिल्यांदा यूएईला विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली आहे.

Story img Loader