ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेच्या पात्रता फेरीतील आव्हान संपुष्टात आलेल्या स्कॉटलंडने अखेरच्या सामन्यात हाँगकाँगचा ८ विकेट्स राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या हाँगकाँगने २० षटकांत ७ बाद १२७ धावा केल्या. मात्र, पावसामुळे स्काँटलंडसमोर १० षटकांत ७६ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले आणि ते त्यांनी  सहज पूर्ण केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scotland win t20 world cup2016